Marathi News> भारत
Advertisement

आणखी एक भारतीय You Tuber पाकिस्तानची हेर? ज्योती मल्होत्रामागोमाग प्रियंका सेनापती रडारवर

Youtuber Jyoti Malhotra News: You Tube च्या माध्यमातून व्लॉगिंग करणाऱ्या युट्यूबरवर तपास यंत्रणांची करडी नजर. ज्योती मल्होत्रामागोमाग प्रियंकाची चर्चा...   

आणखी एक भारतीय You Tuber पाकिस्तानची हेर? ज्योती मल्होत्रामागोमाग प्रियंका सेनापती रडारवर

Youtuber Jyoti Malhotra News: 22 एप्रिलला संपूर्ण भारताला हादरवणारा दहशतवादी हल्ला जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं असणाऱ्या बैसरन व्हॅलीमध्ये झाला (Pahalgam Terror Attack). 26 पर्यटकरांवर निर्दयीपणे गोळीबार करणाऱ्या या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आता भारतीय लष्करासह सर्व तपास आणि संरक्षण यंत्रणांनी कारवाईला वेग दिला आहे. त्याच कारवाईअंतर्गत भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्रा अडचणीत सापडली असून, आता तिच्याप्रमाणेच आणखी एक भारतीय युट्यूबरही पाकिस्तासाठी हेरगिरी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

ओडिशापर्यंत पोहोचला तपास...

ज्योतीपासून सुरू झालेला हा तपास सध्या ओडिशापर्यंत पोहोचला असून, यामध्ये पुरी येथील युट्यूबर प्रियंका सेनापती तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये ज्योतीनं ओडिशातील पुरी शहराला भेट दिली होती. याचवेळी तिनं या भागातील काही फोटो आणि  व्हिडीओ काढले. तिनं हे फोटो पाकिस्तानला दिलेल्या माहितीशी जोडले गेलेले नाहीत ना, याच धर्तीवर सध्या तपास यंत्रणा विविध बारकावे तपासत कारवाई करत आहेत. 

प्रियंका सेनापती ज्योतीच्या पुरी दौऱ्यादरम्यान तिच्या संपर्कात 

यंत्रणांच्या संशयानुसार प्रियंका सेनापती ज्योतीच्या पुरी दौऱ्यादरम्यान तिच्या संपर्कात आली असून, त्याच कारणामुळं प्रियंकाचीसुद्धा चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईतच प्रियंकाच्या एका लाईव्ह पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. 'ज्योती फक्त माझी युट्यूबवरील मैत्रीण होती. तिच्या कामाशी माझा काही संबंध नसून, मला कधी त्यावर संशयही वाटला नाही. ती पाकिस्तानची हेर आहे हे मला ठाऊक असतं तर मी कधीच तिला भेटलेही नसते. मी तपासात पूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार आहे', असं तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केलं. 

सदर प्रकरणात आता फक्त प्रियंकाच नव्हे, तर आणखी काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबरची चौकशी होऊ शकते. पाकिस्तानची हेरगिरी केल्याच्या संशयावरून ही चौकशी केली जाऊ शकेत. दरम्यान, सध्याच्या घडीला पोलीस यंत्रणा अनेक सोशल मीडिया स्टारना रडारवर घेत असून, त्यांनी काढलेले व्हिडीओ, फोटो आणि ड्रोन फूटेज यांच्यावर नजर ठेवून आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्रापर्यंत पोहोचवली जाऊ शकते या संशयातूनच तपास यंत्रणा सध्या ही कारवाई करताना दिसत आहेत. 

Read More