Marathi News> भारत
Advertisement

गाडीची नंबरप्लेट काढल्याचा राग, भाजपा नेत्याची अधिकाऱ्याला मारहाण

या घटनेनंतर राजधानी यादवविरुद्ध अधिकाऱ्यांनी प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

 गाडीची नंबरप्लेट काढल्याचा राग, भाजपा नेत्याची अधिकाऱ्याला मारहाण

झारखंड : झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात भाजपा नेत्याची गुंडागिरी समोर आली आहे. भाजपाच्या स्थानीक नेत्याच्या गाडीची नंबर प्लेट हटविणाऱ्या वाहतूक जिल्हाधिकाऱ्यावर नेता राजधानी यादव यांनी राग काढला.

भर रस्त्यात त्यांनी त्या अधिकाऱ्याला मारहाण केली. हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय. 

रस्त्यावरच मारहाण 

 मंगळवारी डिटिओएफ बारला पोलीस अधिक्षक कार्यालयच्या सुचनेनुसार आणि सरकारी नियमानुसार ही कारवाई होत होती. जवळील जिल्हा २० सूत्री कार्यक्रम उपाध्यक्षाच्या खाजगी वाहनाची नेम प्लेट काढण्यात येत होती.

दरम्यान राजधानी यादव इथे धावत आले. त्यांनी डिटीओला माराहाण करायला सुरूवात केली. रस्त्यावरच त्यांना धक्का देऊ लागले. 

पोलिसांनी घेतले ताब्यात

या घटनेनंतर राजधानी यादवविरुद्ध अधिकाऱ्यांनी प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

घटनेच्या काही वेळातच यादव यांना ताब्यात घेण्यात आले. 

Read More