Marathi News> भारत
Advertisement

एक करोड कॉल्ससहीत Zee News नं घडवला वर्ल्ड रेकॉर्ड

केवळ ७ दिवसांत जगातील सर्वात मोठा डिजिटल सर्व्हे घडवून आणण्याचा चमत्कार Zee News नं एका कॅम्पेनमधून केलाय

एक करोड कॉल्ससहीत Zee News नं घडवला वर्ल्ड रेकॉर्ड

नवी दिल्ली : Zee News नं नागरिकांच्या मदतीनं एक नवा इतिहास रचलाय. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी Zee News नं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल एक करोड नागरिकांनी या कॅम्पेनमध्ये आपला सहभाग नोंदवला. 

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ Zee News नं मिस्ड कॉल मोहीम सुरू केली होती. या मिस्ड कॉलच्या संख्येनं आता एक करोडचा टप्पा अगदी सहज ओलांडलाय. 

संसदेत मंजूर करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन असेल तर ७८३४९९८९९८, ७८३६८००५०० या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचं आवाहन Zee News नं केलं होतं. या आवाहनाला देशाच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. केवळ ७ दिवसांत जगातील सर्वात मोठा डिजिटल सर्व्हे घडवून आणण्याचा चमत्कार Zee News नं या कॅम्पेनमधून केलाय. हा जगातील सर्वात मोठा डिजिटल जनमत संग्रह बनलाय. 

Read More