झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल (Zomato CEO Deepinder Goyal) यांनी 20 नोव्हेंबरला एक पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आपल्या कंपनीत चिफ ऑफ स्टाफ (Chief of Staff) पद रिक्त असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. पण या पदासाठी एक अनपेक्षित अट टाकण्यात आली होती. निवड झालेल्या उमेदवाराला पगाराच्या बदल्यात 20 लाखांची फी भरावी लागेल असं त्यांनी जाहीर केलं होतं. हे पैसे कंपनी किंवा व्यावसायासाठी न वापरता झोमॅटो प्रायोजित धर्मादाय संस्था फिडिंग इंडियाला दिले जाणार आहेत. ही संस्था भुकेलेल्यांना मदत करते.
ही पोस्ट शेअर केल्यानंतर दीपिंदर गोयल यांनी या पदासाटी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल याची अजिबात अपेक्षा नव्हती. दीपिंदर गोयल यांनी नवी अपडेट शेअर करत सांगितलं की, पोस्ट केल्यानंतर फक्त 24 तासात या पदासाठी 10 हजारापेक्षा अधिक अर्ज आले आहेत.
"आमच्याकडे 10,000 पेक्षा जास्त अर्ज आहेत, त्यापैकी बरेच चांगले विचारात घेतलेले आहेत: संमिश्र अर्ज आले आहेत. 1) ज्यांच्याकडे सर्व पैसे आहेत. 2) ज्यांच्याकडे काही पैसे आहेत 3) जे म्हणतात त्यांच्याकडे पैसे नाहीत 4) ज्यांच्याकडे खरोखर पैसे नाहीत,” असं गोयल यांनी सांगितलं आहे. "आम्ही आज संध्याकाळी 6 वाजता अर्ज स्विकारणं बंद करणार आहोत. अपडेट 3 साठी संपर्कात राहा," असंही त्यांनी सांगितलं आहे.
Update 2: we have over 10,000 applications, a lot of them well thought through, mixed between -
— Deepinder Goyal (@deepigoyal) November 21, 2024
1. Those who have all the money
2. Those who have some of the money
3. Those who say they don’t have the money
4. Those who really don’t have the money
We will be closing the… https://t.co/8a6XhgeOGk
या उपक्रमामुळे परोपकारासह व्यावसायिक संधींचं मिश्रण करण्याकडे लक्ष वेधलं होतं, ज्यामुळे तो सर्व उद्योगांमध्ये चर्चेचा मुद्दा बनला होता.
गोयल यांनी पहिल्या पोस्टमध्ये नमूद केलं होतं, की झोमॅटो बाहेरुन इतरांचं प्रमाणपत्र मिळण्यापेक्षा किंवा आर्थिक पुरस्कारांऐवजी स्व-विकासाच्या भूमिकेच्या संभाव्यतेने प्रेरित अर्जदार शोधत आहे. ''आमचा असा विश्वास आहे की जे लोक या भूमिकेसाठी अर्ज करतात त्यांनी हे एखाद्या फॅन्सी, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी न करता शिकण्याच्या संधीसाठी केलं पाहिजे. ज्यामुळे तुम्ही स्वतःसमोर किंवा तुम्ही प्रभावित करू इच्छित असलेल्या लोकांसमोर कूल दिसाल.'' लिहिले.
विशेष म्हणजे, या पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला झोमॅटोच्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामध्ये ब्लिंकिट, हायपरप्युअर आणि फीडिंग इंडिया यांचा समावेस आहे.