Marathi News> भारत
Advertisement

चिमुकलीचा 'आनंद' पाहून महिंद्रा देखील भारावले, दिली अशी प्रतिक्रिया, Tweet viral

Anand Mahindra यांचं आणखी एक ट्विट सध्या चर्चेत आहे. चिमुकलीचा आनंद पाहून पहा आनंद महिंद्रा काय म्हणाले...

चिमुकलीचा 'आनंद' पाहून महिंद्रा देखील भारावले, दिली अशी प्रतिक्रिया, Tweet viral

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अॅड महिंद्राचे (M&M) चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) नेहमी ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून सोशल मीडियावर अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतं. अनेकदा ते वेगवेगळे व्हिडीओ आणि माहितीपूर्ण ट्विट शेअर करताना दिसतात. अशातच महिंद्रा यांचं आणखी एक ट्विट सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

ट्विटरवर एका व्यक्तीने Mahindra XUV700 गाडी घेतल्याचा आनंद व्यक्त केला. त्यावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी मजेशीर रिप्लाय देऊन सर्वांचं मन जिंकलं. थोटा श्रीकांत नावाच्या एका व्यक्तीने महिंद्रा अॅड महिंद्रा (M&M) कंपनीची XUV700 AX7L ही लक्झरी कार खरेदी केली. गाडी घेतल्यानंतर कुटुंबासोबतचे काही फोटो श्रीकांत यांनी ट्विटरवर शेअर केले.

श्रीकांत यांनी दोन फोटो शेअर केले. या फोटोमध्ये एका बाजूला स्वत: श्रीकांत दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोत श्रीकांत यांची मुलगी आनंद व्यक्त करताना दिसत आहे. लक्झरी कारचा दार उघडताना मुलीचा आनंद गगनात मावत नव्हता. हाच फोटो आनंद महिंद्रा यांना भावलेला दिसत आहे.

आनंद महिंद्रांची प्रतिक्रिया...

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी श्रीकांत यांचं ट्विट रिट्विट करत प्रतिक्रिया दिली. "कृपया तुमच्या मुलीला सांगा की तिने माझा आजचा दिवस आनंदी केला", असं आनंद महिंद्रा म्हणाले. त्याचबरोबर महिंद्रा यांनी आनंद आणि समाधान व्यक्त करणारी इमोजी देखील शेअर केली आहे.

आनंद महिंद्रांचे ट्विट  (Twitter) नेहमी व्हायरल होत असतात. महिंद्रा यांचे ट्विटरवर तब्बल 94 लाख फॉलोवर्स आहेत. ट्विटर मोटिवेशन कंटेट पोस्टसाठी महिंद्रांचे पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर देखील होतात.

Read More