IPL 2023 CSK Vs GT LIVE: इंडियन प्रमियम लीग 2023 च्या यंदाच्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना आज चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) यांच्यात हा सामना खेळवला जाईल. आजचा सामना जिंकून थेट फायलन गाठण्याचा आकस दोन्ही संघांचा असणार आहे. त्यामुळे आज आयपीएल 2023 चा पहिला फायनलिस्ट मिळेल.
गुजरातचा खेळ खल्लास केला. तुषार देशपांडेने राशिदची विकेट काढली. आता गुजरात टायटन्सला 8 चेंडूत 31 धावांची गरज आहे,
गुजरात टायटन्सला 30 चेंडूत 71 धावांची गरज होती.त्यानंतर आता राशिदने आक्रमक फलंदाजीला सुरूवात केली असून आता विजयासाठी 17 चेंडूत 38 धावांची गरज आहे.
गुजरात टायटन्सला 30 चेंडूत 71 धावांची गरज आहे.
173 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. गुजरातने 5 विकेट गमावल्या असून आता राशिदच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे.
फायनलच्या तिकीटासाठी गुजरात समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. तेवतिया आणि विजय शंकर मैदानात असून विजयासाठी गुजरात टायटन्सला 38 चेंडूत 79 धावांची गरज आहे.
गुजरातला पहिला धक्का बसला असून आता गुजरात टायटन्सला 145 धावांची गरज आहे. हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल सध्या मैदानात आहेत.
पहिल्या डावात चेन्नई सुपर किंग्जने 20 ओव्हरमध्ये 172 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता गुजरात टायटन्स विजयासाठी 173 धावांची गरज आहे. 173 धावांचं आव्हान पूर्ण करून गुजरात टायटन्स फायनलचं तिकीट मिळवणार? की चेन्नई गुजरातचा सुर आवळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मोहित शर्माच्या बॉलवर फटका मारण्याच्या नादात थाला धोनी फक्त 1 रन करत बाद झाला.
धोनीच्या एन्ट्रीला प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
QUALIFIER 1. WICKET! 17.6: Ambati Rayudu 17(9) ct Dasun Shanaka b Rashid Khan, Chennai Super Kings 148/5 https://t.co/A6FkV6K1tF #Qualifier1 #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023
दमदार सुरूवातीनंतर गुजरातने चेन्नईचा सूर आवळला. रायडूच्या रुपात चेन्नईला पाचवा धक्का बसला. रायडू 17 धावा करत बाद झाल्याने धोनी मैदानात उतरला आहे.
चेन्नईला चौथा धक्का बसलाय. शमीने खतरनाक डेव्हिड कॉन्वेला तंबुत पाठवलं. तो 40 धावा करत बाद झाला.
चेन्नईला दुसरा फलंदाज बाद झाला आहे. मोठे फटके मारण्यासाठी पाठवण्यात आलेला शिवम दुबे स्वस्तात परतला आहे. त्याला फक्त 1 धाव करता आली.
ऋतुराज गायकवाडच्या रुपात चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का बसलाय. तो 44 बॉलमध्ये 60 धावा करत बाद झाला. मोहित शर्मा याने गुजरातला पहिली विकेट मिळवून दिलीये.
महत्त्वाच्या सामन्यात फक्त 36 बॉलमध्ये ऋतुराज गायकवाडची फिफ्टी झळकावली आहे.
पावरप्लेमध्ये चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी जोरदार आक्रमण करत 6 ओव्हरमध्ये 49 धावा कुटल्या आहेत. ऋतुराज 33 धावांवर खेळतोय. तर कॉन्वे 14 धावांवर खेळतोय.
ऋतुराज गायकवाडने नवख्या दर्शन नळकांडेची पिसं काढली. सिक्स अन् फोरचं खेचत पावरप्लेमध्ये चेन्नईने दमदार सुरूवात केलीये. दर्शन नळकांडेने 2 ओव्हरने 22 रन्स दिले.
दर्शन नळकांडे (Darshan Nalkande) याच्या बॉलवर ऋतुराज गायकवाड याने फटका मारला पण बॉल थेट शुभमन गिलच्या हातात गेला. त्यावेळी अंपायरने नो बॉल दिला. चेन्नईच्या मैदानात एकच जल्लोष सुरू झाला. त्यानंतर फ्री हीटवर ऋतुराजने सिक्स खेचलाय.
मॅचला सुरूवात... चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे मैदानावर
शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (w), हार्दिक पांड्या (C), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना
आजच्या सामन्यात गुजरातने यश दयाळ याच्या जागी दर्शन नळकांडे (Darshan Nalkande) याला संघात संधी दिली आहे.
IPL 2023 CSK Vs GT LIVE Toss Update: गुजरात टायटन्सने जिंकला टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या हंगामात शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा यांची जोडी सुपरहिट ठरलीये. त्याचवेळी, विजय शंकर, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी मधल्या फळीत फलंदाजांनी आक्रमक खेळी देखील केलीये. त्यामुळे अधिक सामने जिंकण्यात गुजरातला यश आलंय.
पाऊस झाला तर... आजच्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात पाऊस झाला तर निकाल हा लीग स्टेजच्या आधारावर दिला जाणार आहे. त्यानुसार गुजरातचा संघ हा फायनलमध्ये पोहचेल.
क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) हे दोन तगडे संघ आमने सामने असणार आहेत. गुजरात आणि चेन्नई संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये फारसे बदल होण्याची शक्यता नाही.
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (C), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना (इम्पॅक्ट खेळाडू: मथीशा पाथिराना)
रिद्धिमान साहा (WC), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (C), साई सुधारन/विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, यश दयाल (इम्पॅक्ट खेळाडू: जोशुआ लिटल /दासुन शनाका)
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.