Marathi News> कोकण
Advertisement

सर्वात मोठी बातमी : नितेश राणेंना अटक होणार?, जामीन अर्ज फेटाळला

 नितेश राणेंना अटक होणार?, जामीन अर्ज फेटाळला

सर्वात मोठी बातमी : नितेश राणेंना अटक होणार?, जामीन अर्ज फेटाळला

कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अखेर भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत खालच्या न्यायालयात हजर व्हा, असे स्पष्ट आदेश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसेच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे आदेश दिले होते. यासाठी न्यायालयाने नितेश राणे यांना 10 दिवसांची मुदत दिली होती. तसेच तोपर्यंत त्यांना अटक करु नये, असे निर्देश देत दिलासा दिला होता.

त्यानंतर काल नितेश राणे जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. मात्र, जिल्हा न्यायालयाने आज दुपारी ३ पर्यंत निकाल राखून ठेवला होता. आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. 

 

Read More