Marathi News> कोकण
Advertisement

महाराष्ट्रातील 'या' गावात पहायला मिळते निसर्गापेक्षा सर्वात सुंदर दृष्य; कोकणातील आजीला भेटायला येणारा मोर

कोकणात एक असे गाव जिथे एका आजीबाईंना मोर भेटायला येतो. आजीबाई या मोराशी गप्पा देखील मारतात.  

महाराष्ट्रातील 'या' गावात पहायला मिळते निसर्गापेक्षा सर्वात सुंदर दृष्य; कोकणातील आजीला भेटायला येणारा मोर

Peacock Who Comes To Meet Old Women In Malvan Village: कोकण म्हणजे महाराष्ट्राचा स्वर्ग. कोकणातील गावे म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण. मात्र, याच कोकणातील एक गाव जिथे  निसर्गापेक्षा सर्वात सुंदर दृष्य पहायला मिळते. हे दृष्य म्हणजे रोज आजीला भेटायला येणारा मोर. आजी आणि मोराची अनोखी मैत्री पाहून सगळेच अचंबित होतात.    

मोराशी मैत्री करणाऱ्या कोकणातील या आजीबाईंची सोशल मिडियावर जोरदार चर्चा आहे. आजीबाई आणि मोराच्या मैत्रीची स्टोरी देखील तितकीट इंटरेस्टिंग आहे. आजी आणि मोराच्या मैत्रीला आठ वर्ष झाली आहेत.  या आजीबाईंचे घर जवळपास जंगलात आहे.  आजीनी खूप साऱ्या कोंबड्या पाळल्या आहेत. आठ वर्षांपूर्वी आजी नेहमीप्रमाणे कोंबड्यांना दाणे खायला घालत होत्या. यावेळी दाणे खाण्यासाठी एक मोराचं पिल्लू आलं. ते पिल्लू या कोंबड्यांसाठी टाकलेले दाणे खाऊ लागलं. तेव्हापासूनच जेव्हा जेव्हा आजी कोंबड्यांसाठी दाणे टाकतात तेव्हा तेव्हा हा मोर तिथं येऊन हे दाणे खातो. तेव्हापासून या आजीबाईंची मोरासह गटट्ी बनली आहे. आजी या मोराशी निवांत गप्पा देखील मारतात. 

मोर सर्वांचाच आवडता पक्षी आहे. मात्र, मोर  शहरातील लोकांसाठी फार दुर्मिळ दर्शन देणारा पक्षी आहे. मोर सहसा लोकांच्या  संपर्कात येत नाही. यामुळेच एका तरुणाने आजी आणि मोराचे फोटो व्हिडिओ काढले आहे. या तरुणाने हे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आणि आजीबाई व्हायरल झाल्या. 

कोकणातील कणकवलीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या असरोंडी गावात आजी आणि मोराच्या मैत्रीचे सर्वात सुंदर दृष्य पहायला मिळते. सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडिओ पाहून अनेकजण या आजीबाईंना भेटायला येतात. 

Read More