Marathi News> कोकण
Advertisement

एकनाथ शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेकडून कारवाई; तातडीने पदावरून हकालपट्टी

 राज्यातील शिवसेनेतील कलह सुरूच असून रत्नागिरी जिल्ह्यातही मोठ्या घडामोडी सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले माजी मंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांवर शिवसेनेकडून कारवाई करण्यात आली आहे. 

एकनाथ शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेकडून कारवाई; तातडीने पदावरून हकालपट्टी

रत्नागिरी : राज्यातील शिवसेनेतील कलह सुरूच असून रत्नागिरी जिल्ह्यातही मोठ्या घडामोडी सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले माजी मंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांवर शिवसेनेकडून कारवाई करण्यात आली आहे. 

शिवसेना तालुकाप्रमुख तुषार साळवी आणि उपजिल्हा प्रमुख केतन शेट्ये यांना पदावरून हटवण्यात आले आहे. आमदार उदय सामंत एकनाथ शिंदे गटाला सामिल झाल्याने त्यांच्या समर्थकांवर शिवसेनेकडून कारवाई करण्यात आली. 

तुषार साळवी आणि केतन शेट्ये यांना उदय सामंत यांना उघड पाठिंबा देणं महागात पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. येत्या काही दिवसात आणखी पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत शिवसेनेने दिले आहेत.

Read More