Marathi News> कोकण
Advertisement

Year Ender : 2017 मध्ये 'हे' मराठी कलाकार अडकले लग्नबंधनात

 या वर्षात अनेक घडामोडी  घडल्या. तसेच अनेक मराठी कलाकारांचे दोनाचे चार हात झाले.

Year Ender : 2017 मध्ये 'हे' मराठी कलाकार अडकले लग्नबंधनात

मुंबई : या वर्षात अनेक घडामोडी  घडल्या. तसेच अनेक मराठी कलाकारांचे दोनाचे चार हात झाले.

कुणी डेस्टिनेशन वेडिंग केलं तर कुणी अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं. तर कुणाच्या लव्ह मॅरेज होतं तर कुणाचं अगदी सविस्तर ठरवून झालं लग्न. इअर एंडरच्या या स्टोरीत पाहूया कुणाची लग्नगाठ जुळली? या इअर एंडरच्या स्टोरीत पाहणार आहोत यंदाच्या वर्षी लग्नबंधनात अडकणारे कलाकार 

fallbacks

अमेय वाघ - साजिरी देशपांडे 

अमेय आणि साजिरी यांचा विवाह समारंभ 2 जुलैला पार पडलं. अमेय आणि साजिरी हे दोघे एकमेकांना गेली 13 वर्षे डेट करत होते. या विवाह सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. पुण्यातील श्रृतीमंगल कार्यालयात त्यांच लग्न झालं. यावेळी मुरांबा आणि फास्टर फेणे या सिनेमांमुळे अमेयची चर्चा झाली. याच काळात अमेय वाघ विवाह बंधनात अडकला. 

fallbacks

मनवा नाईक - सुशांत तुंगारे 

अभिनेत्री मनवाने निर्माता सुशांत तुंगारेसोबत लग्न केलं. या दोघांनी 'चूकभूल द्यावी घ्यावी' या सिनेमाची निर्मिती केली आहे. तसेच कलर्स मराठीवरील सरस्वती या मालिकेची निर्मिती सुशांतने केली आहे. मनवाने अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं असून या लग्नाला अगदी मोजकेच कलाकार उपस्थित होते. हे लग्न 17 मार्च 2017 रोजी झालं. 

fallbacks

प्रल्हाद कुडतरकर - अंजली कानडे 

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पांडू म्हणजे प्रल्हाद कुडतरकर. या मालिकेचं लेखन देखील प्रल्हादने केलं आहे. मे महिन्यात हे दोघे लग्नबंधनात अडतले. अंजली ही योग प्रशिक्षक असून त्यांचा हे लग्न लव्हमॅरेज आहे. रात्रिस खेळ चाले या मालिकेबरोबरच प्रल्हादने नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेचं लेखन देखील केलं आहे. सध्या प्रल्हाद गाव गाता गझाली या मालिकेचं लेखन करत आहे. 

fallbacks

प्रार्थना बेहरे - अभिषेक जावकर 

मराठी सिनेसृष्टीत प्रार्थना बेहरेचे डेस्टिनेशन वेडिंग भरपूर चर्चेत आलं. प्रार्थना बेहरेने 14 नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकली. प्रार्थनाने निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या अभिषेक जावकरसोबत विवाह केला आहे. 
प्रार्थनाने गोव्यामध्ये आपलं डेस्टिनेशन वेडिंग केलं आहे. यावेळी अनेक मराठी कलाकार उपस्थित होते. प्रार्थना आणि अभिषेकचं हे अरेंज मॅरेज आहे यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. 

fallbacks

रोहन गुजर - स्नेहल देशमुख 

होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवीचा भाऊ पिंट्या म्हणून लोकप्रिय झाला. या रोहन गुजरने 21 नोव्हेंबरला अतिशय साधेपणाने लग्न केलं. रोहन आणि स्नेहल यांचं लव्ह मॅरेज असून त्यांच्या लग्नाला फक्त मोजून 15 जण उपस्थित होते. या दोघांचं लग्न 21 नोव्हेंबरला पार पडलं. 

fallbacks

आरोह वेलणकर - अंकिता शिंगवी 

रेगे या सिनेमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता आरोह वेलणकर. आरोहचं लग्न 11 डिसेंबरला विवाह बंधनात अडकला. आरोहने आपली कॉलेजमैत्रिण अंकिता शिंगवी हिच्याशी महाबळेश्वरमध्ये लग्न केलं. अंकिता ही उत्तम नृत्यांगना आहे. लग्नाअगोदर या दोघांच्या प्री वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नितीन देसाई या स्टुडिओमध्ये यांनी हे फोटोशूट केलं आहे. याची भरपूर चर्चा झाली. 

fallbacks

अभिनव सावंत - पूर्वा पंडित 

मराठी सिनेमा सृष्टीत स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलेली अभिनेत्री म्हणून निर्मिती सावंत यांच्याकडे पाहिलं जातं. निर्मिती यांचा मुलगा अभिनय याचं 13 डिसेंबरला विवाह झाला. अभिनय देखील याच क्षेत्रात आहे. नकटीच्या लग्नाला यायचं हं... या मालिकेत अभिनय भावाच्या भूमिकेत आहे. अभिनयने त्याची मैत्रिण पूर्वा पंडत हिच्यासोबत लग्न केलं आहे. या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार उपस्थित होते. 

fallbacks

अक्षया गुरव - भूषण वाणी 

लव्ह लग्न लोचा या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अक्षया गुरव नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. सिनेमॅटोग्राफर भूषण वाणी याच्याशी लग्न केलं आहे. 23 नोव्हेंबर 2017 मध्ये हे लग्नबंधनात अडकले आहे. एका मित्राच्या माध्यमातून अक्षया आणि भूषणची ओळख झाली. अक्षय आणि भूषण याचं प्रेम विवाह आहे. 

fallbacks

मयुरी वाघ - पियुष रानडे 

झी मराठीवरील अस्मिता मालिकेत पियुष-मयुरीची जोडी जमली होती. ही जोडी प्रेक्षकांना इतकी आवडली की या जोडीने लग्न करावे अशा आग्रहाचे मॅसेजेस-पत्रे या दोघांना येऊ लागले. कालांतरानेसोबत काम करता करता हे दोघे खरच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मयुरीचे हे पहिले तर पियुषचे हे दुसरे लग्न आहे. आगदी थाटामाटात यांचा विवाहसोहळा बडोदा येथे पार पडला. यावेळी त्यांच्या आनंदात सामील होण्यासाठी त्यांचे काही खास मित्रही पोहोचले होते. 30 जानेवारीला मेहंदीचा कार्यक्रम झाला आणि 1 फेब्रुवारी रोजी मयुरी-पियुष कायमचे एकमेकांचे झाले.

fallbacks

शशांक केतकर - प्रियंका 

अभिनेता शशांक केतकर नुकताच लग्नाच्या बंधनात अडकला. व्यवसायाने वकील असलेल्या प्रियांका ढवळेची शशांकने जोडीदाराच्या रुपात निवड केली. 4 डिसेंबर रोजी पुण्यात दोघांचे थाटात लग्न झाले. शशांकचे हे दुसरे तर प्रियांकाचे पहिले लग्न आहे. पारंपरिक पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. लग्नानंतर दोघांचे वेडिंग रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शन पार्टीचे काही फोटोज समोर आले आहेत. या फोटोमध्ये प्रियांका प्रिन्सेस लूक अतिशय सुंदर दिसत आहे.

Read More