Marathi News> Lifestyle
Advertisement

Chanakya Niti : कोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, जीवनात कधीच येणार नाही अपयश

जीवनात प्रत्येकाला यश हवं असतं, अशावेळी प्रत्येकजण समोरच्या व्यक्तीकडून शिकत असतो. अशावेळी आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये कोंबड्याकडून 4 गोष्टी शिकण्याचा सल्ला दिला आहे. 

Chanakya Niti : कोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, जीवनात कधीच येणार नाही अपयश

चाणक्य नीतिचा प्रयोग किंवा वापर अनेकजण आपल्या खासगी जीवनात करतात. चाणक्य नीतीचे पालन अनेकांनी जीवनात यश, पैसा आणि संपत्ती संपन्न करण्यास मदत करते. चाणक्य नीतीचा वापर करुन आपण बिघडलेल्या प्रश्नावर उत्तर शोधू शकते. प्राचीन काळात आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी आपल्या जीवनात यश संपादन केले. अशावेळी आचार्य चाणक्य यांनी कोंबड्याकडून चार गोष्टी शिकावेत असा सल्ला दिला होता. 

पुनरुत्थान, युद्ध, विभाजन, गठबंधन।
स्वयमाक्रम्य भुक्ता दण्डितः।

आचार्य चाणक्य यांनी 'रचना शास्त्र' च्या 17 व्या श्लोकात म्हटलं आहे की, मनुष्याला पुस्तकांसोबतच वेगवेगळ्या जीव-जंतूंकडून भरपूर गोष्टी शिकण्यासारखं आहे. जर तुमच्या कामात एकाग्रता नसेल तर जीवनात अपयश येते. असावेळी कोंबड्याकडून शिकाव्यात 4 गोष्टी. 

ब्रम्ह मुहूर्तावर उठावे

आचार्य चाणक्य म्हणतात की, ब्रह्म मुहूर्तावर कोंबडा रोज उठतो. तुम्हालाही जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रोज ब्रह्म मुहूर्तावर उठा. यामुळे तुम्हाला काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. या वेळेचा तुम्ही सकारात्मक वापर करू शकता.

कामासाठी नेहमी तयार रहा

कोंबडीची आणखी एक सवय म्हणजे नेहमी लढाईसाठी तयार राहणे. याचा अर्थ आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असले पाहिजे. तुम्ही आळशी असाल तर तुम्ही मागे राहू शकता. यासाठी योगदान देण्यास सदैव तयार राहा.

 समान वाटप करणे 

कोंबड्याची तिसरी सवय म्हणजे आपल्या भावांना समान वाटा देणे. देव आणि भावाचा वाटा हिरावून घेऊ नये असे शास्त्रात सांगितले आहे. कोंबडा नेहमी आपल्या भावांना समान वाटा देतो. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या भावाला त्याचा योग्य वाटा द्या.

आहार करताना

कोंबडीची चौथी सवय म्हणजे धैर्याने खाणे. आचार्य चाणक्य म्हणतात की माणसाने न घाबरता अन्न खावे. यामुळे व्यक्ती मजबूत होते. निरोगी मन आणि शरीर असलेली व्यक्ती आपले काम उत्साहाने करू शकते. या 4 गोष्टी लक्षात ठेवल्याने माणूस आयुष्यात कधीही अपयशी होत नाही.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या दावा केला गेलेला नाही.)

Read More