Marathi News> Lifestyle
Advertisement

चविष्ट आणि आरोग्यदायी बीटरूट इडली रेसिपी; नक्की ट्राय करा

बीट हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. मात्र, त्यापासून तयार केलेली ही इडली तुम्ही कधी बनवली आहे का? ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही इडली चवदार तर आहेच, पण आरोग्यासाठीही खूप उपयुक्त ठरते. तर जाणून घेऊया बीटरूट इडलीची रेसिपी.

चविष्ट आणि आरोग्यदायी बीटरूट इडली रेसिपी; नक्की ट्राय करा

Beetroot Idli Recipe: बीट हा एक पौष्टिक आणि आरोग्यदायी कंदमूळ आहे. यामध्ये लोह, अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स, फोलेट आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असतात. बीट रक्तशुद्धीकरणासाठी उपयुक्त असून त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर मानला जातो. बीटरूटचा आहारात समावेश केल्यास रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि शरीराला उर्जा मिळते. बीटाचा वापर पराठा, ज्यूस, हलवा यांसारख्या विविध पदार्थांमध्ये केला जातो. हीच पौष्टिकता जेव्हा इडलीसारख्या पारंपरिक पदार्थात मिसळते, तेव्हा ती इडली केवळ चवदारच नव्हे तर शरीरासाठीही अत्यंत उपयुक्त ठरते. जाणून घेऊयात या बीटरुट इडलीची रेसिपी.  

साहित्य:
- इडलीचे पीठ  
- 1 मध्यम आकाराचा बीट (किसलेला)  
- 1/2 कप दही  
- 1 टीस्पून मोहरी  
- 1 टीस्पून उडीद डाळ  
- 1-2 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)  
- 8-10 कढीपत्त्याची पाने  
- मीठ चवीनुसार  
- थोडं तेल फोडणीसाठी  

हे ही वाचा: गव्हाचे पीठ मिळताना फक्त हे 2 पदार्थ मिसळा; मऊ लुसलुशीत होतील चपात्या

कृती: 

एका कढईत थोडं तेल गरम करा. त्यात मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करा.  
त्यामध्ये किसलेला बीटरूट त्यात घालून 2 ते 3 मिनिटे परतून घ्या. नंतर गॅस बंद करा आणि थोडं थंड होऊ द्या.  
एका भांड्यात इडली पीठ, दही, मीठ आणि परतलेला बीटरूट मिक्स करा. आवश्यक असल्यास थोडं पाणी घालून पीठ चांगले ढवळून घ्या.  
यानंतर इडली पात्रात सगळीकडे नीट तेल लावून त्यावर इडलीचे पीठ घाला.  
इडली स्टीमरमध्ये 10-12 मिनिटे वाफवून घ्या. 
इडडी तयार झाल्यानंतर लगेच पात्रातून बाहेर काढू नका, नाही तर इडली पात्रला चिटकू शकते. 2-3 मिनिटांनी गुलाबी रंगाच्या आरोग्यदायी बीटरूट इडल्या नारळाच्या चटणी किंवा सांभारसोबत सर्व्ह करा.
ही इडली तुम्ही कोणत्या चटणी शिवायही खाऊ शकतात. 

Read More