Marathi News> Lifestyle
Advertisement

केस खूप गळतायत? दिवसातून फक्त 10 मिनिटं करा हे काम, केस होतील मजबूत

महिला आणि पुरुषांमध्ये केस गळणं ही सध्या खूप कॉमन समस्या बनली आहे. तेव्हा जर हेअर फॉल थांबवायचं असेल तर तुमची लाईफस्टाईल चांगली असणे गरजेचे असते. 

केस खूप गळतायत? दिवसातून फक्त 10 मिनिटं करा हे काम, केस होतील मजबूत

महिला आणि पुरुषांमध्ये केस गळणं ही सध्या खूप कॉमन समस्या बनली आहे. ज्याचं कारण अनहेल्दी लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि हार्मोनल इम्बॅलेंस असू शकते. तेव्हा जर हेअर फॉल थांबवायचं असेल तर तुमची लाईफस्टाईल चांगली असणे गरजेचे असते. व्यायाम हा तुमच्या शरीरासाठी खूप महत्वाचा असतो. तेव्हा अशा तीन योगासनांबद्दल सांगणार आहोत ज्याचा तुम्ही दैनंदिन जीवनात समावेश केल्यास केस गळण्याची समस्या दूर होऊ शकते. 

हस्तपादासन : 

fallbacks

हस्तपादासन हा असा योग प्रकार आहे  ज्यामुळे पाय आणि पाठ स्ट्रेच होते आणि ब्लड सर्क्युलेशन वाढते. यामुळे केसांचं गळणं थांबत आणि हेअर ग्रोथ चांगली होण्यास मदत होते. तेव्हा हस्तपादासन हा योग्य प्रकार कसा करावा याविषयी जाणून घेऊयात. हस्तपादासन करताना सर्वात आधी पायांवर सरळ उभं राहावं आणि नजर समोर ठेवावी. त्यानंतर लांब श्वास घ्या आणि हात वर करा. आता श्वास सोडताना, समोरच्या बाजूने खाली वाका. आता हातांनी पायांना पकडा. थोड्या मिनिटांनी पुन्हा ही स्थिती सोडून सरळ उभे राहा. 

चक्रासन : 

fallbacks

योगेंद्र चक्रासन या आसनात सुरुवातीला सरळ उभे राहा. मग स्वतःला वाकवा या आसनामुळे डोक्यापर्यंत ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने पोहोचते. यामुळे केस गळणे थांबते आणि केसांचं आरोग्य सुधारतं. योगेंद्र चक्रासन करताना दोन्ही पाय थोडे रुंद करा. मग दोन्ही हात वरती घेऊन पाठीला हलके मागे स्ट्रेच करा. आता हळूहळू शरीर पुढच्या दिशेने वाकवा. चक्रासन करण्यासाठी सर्वात आधी जमिनीवर सतरंजी किंवा योगा मॅट टाकून पाठीवर झोपा. मग डोक्याच्या बाजूला दोन्ही हातांचे तळवे टेकवा. पाय गुडघ्यात दुमडा आणि तळपाय नितंबाच्या जवळ घ्या. आता तळहात आणि तळपायावर भर देऊन पाठ, कंबर, मान, डोके उचला. सुरुवातीला एकदम हे आसन जमणार नाही. त्यामुळे हळूहळू हे आसन करा. ही आसनस्थिती  30 ते 40 सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.

उष्ट्रासन : 

fallbacks

उष्ट्रासनला कॅमल पोज असेही म्हंटले जाते. उष्ट्रासन केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदशीर ठरते यामुळे केस गळण्याची समस्या थांबते. वज्रासनात बसून मग गुडघ्यावर उभे राहा. हात मागे ठेवा. गुडघे खांद्याला समांतर आणि पायाचे तळवे आकाशाच्या दिशेला असतील. आता श्वास घेत हळुहळू डावा हात मागे घेऊन जा. डाव्या पायाच्या तळव्यावर हात ठेवा. अशा प्रकारे उजवा हातही उजव्या पायाच्या तळव्यावर ठेवा. यावेळी कंबर मागच्या बाजूला वाकलेली असेल. आता मान मागे करा आणि एकदम सैल सोडा. लांब श्वास घेत, जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ आसनात थांबून राहा.

Read More