How to make Mutton Galawat Kabab: ईद अगदी दोन दिवसावर येऊन ठेपली आहे. ईदला अनेक वेगवेगळे व्यंजन बनवले जातात. यात नॉनव्हेज पदार्थ आवर्जून असतात. कबाब ही डिश अनेक नॉनव्हेज लव्हर्सला आवडते. गलावत कबाब बघून तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. सुगंधित मसाल्यांमध्ये तयार केले जाणारे आणि जिभेवर सहज विरघळणारे सॉफ्ट कबाब कोणाला नाही आवडत. तसेच, हे कबाब लखनऊमध्ये खूप प्रसिद्ध आहे. कबाब बऱ्याचदा पार्ट्यांमध्ये सर्व्ह केले जातात. पण तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ईदसाठी किंवा डिनर पार्टी दरम्यान घरीच कबाब बनवू शकता. चला जाणून क्लब महिंद्राच्या मास्टरशेफ शेफ शेख कादीर कडून जाणून घेऊयात मटण गलावत कबाबची रेसिपी..
मटण गलावटी कबाबसाठी लागणारे साहित्य
- मटण किमा ५०० ग्रॅम
- कांदा १०० ग्रॅम
- काजू ५० ग्रॅम
- पपईची साल ४० ग्रॅम
- गुलाबाची पाकळी ५ ग्रॅम
- दगडफूल ५ ग्रॅम
- काश्मिरी चिली पावडर २० ग्रॅम
- धणे पावडर १० ग्रॅम
- जिरे पावडर १० ग्रॅम
- वेलची पावडर ५ ग्रॅम
- केसर ०५ ग्रॅम
- तूप २०० ग्रॅम
- केवरा पाणी २० मिली
- गरम मसाला पावडर १० ग्रॅम
कसे बनवायचे मटण गलावटी कबाब ?
- एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये, किसलेले मटण, कच्च्या पपईची पेस्ट, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला पावडर, लाल तिखट, जिरे पावडर, धणे पावडर, लवंग पावडर, दालचिनी पावडर, वेलची पावडर, मीठ, तपकिरी कांद्याची पेस्ट आणि तपकिरी काजूची पेस्ट एकत्र करा.
- मिश्रण झाकून ठेवा आणि ते रेफ्रिजरेटरमध्ये किमान २ तास मॅरीनेट होऊ द्या.
- मॅरीनेट केल्यानंतर, मिश्रण एका मोठ्या भांड्यात ठेवा आणि कोळसा आणि तूप वापरून त्याला स्मोकी फ्लेवर द्या.
- मिश्रणाचे लहान, चपटे पॅटीज बनवा.
- मध्यम आचेवर एका फ्राईंग पॅनमध्ये तूप गरम करा.
- पॅटीज सोनेरी तपकिरी होईपर्यंत आणि दोन्ही बाजूंनी शिजेपर्यंत थोडेसे तळा.
- पुदिन्याच्या चटणी आणि लच्छा कांद्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.