Marathi News> Lifestyle
Advertisement

कोणत्या प्राण्याचं मांस चीनमध्ये सर्वाधिक प्रमाणात खाल्ल जातं? प्राण्याचं नाव वाचून तुम्हाला बसेल धक्का

Meat In China: करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर चिनी खाद्यासंस्कृती पुन्हा एकदा मांसाहाराचं प्रमाण अधिक असल्याने आणि वेगवेगळ्या प्रजातीच्या प्राण्यांचं मांस खाल्लं जात असल्याने टिकेची धनी ठरली होती. मात्र चीनमध्ये कोणत्या प्राण्याचं मांस सर्वाधिक खाल्लं जातं माहितीये का?

कोणत्या प्राण्याचं मांस चीनमध्ये सर्वाधिक प्रमाणात खाल्ल जातं? प्राण्याचं नाव वाचून तुम्हाला बसेल धक्का

China Eating Habits: जगात 190 हून अधिक देश आहे. प्रत्येक देशाची स्वत:ची वेगळी संस्कृती असून त्यामध्ये खाद्यसंस्कृती हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जगातील बहुतांश देशमध्ये मांसाहार अगदी आवडीने केला जातो. मांसाहार करणाऱ्या देशांमध्ये चीनचं नाव आवर्जून घेतलं जातं. खरं तर चिनी खाद्यपदार्थांबद्दल जगभरामध्ये मोठी क्रेझ आहे. मात्र मूळ चिनी खाद्यपदार्थ हे आपल्याकडे मिळतात त्या चिनी पदार्थांपेक्षा फारच वेगळे असतात. चीनची खाद्यसंस्कृती मध्यंतरी करोनाचा प्राथमिक प्रादुर्भाव वुहान येथील कत्तलखान्यात वटवाघळांच्या मांसामधून झाल्याची बातमी समोर आल्यानंतर टीकेची धनी ठरली होती. करोनाचा प्रादुर्भाव जगभरात पसरल्यानंतर आपल्यापपैकी अनेकांनी मस्करीत चिनी लोकांना भाज्या खायला शिकवा अशा अर्थाचे विडंबनात्मक विनोदही व्हॉट्सअपवर वाचले, फॉरवर्ड केले असतील. मात्र चीनमध्ये राहणारे लोक सर्वाधिक प्रमाणात कोणत्या प्राण्याचं मांस खातात तुम्हाला माहितीये का? आता तुमच्यासमोर कोंबडी, मटण वगैरेसारख्या गोष्टी आणि फार फार तर गोमांस, साप, मगर, बदक वगैरेसारखे प्राणी येतील. मात्र या प्रश्नाचं उत्तर फारच आश्चर्यकारक आणि वाचून तुम्हाला धक्का बसेल असं आहे. याबद्दलच सविस्तरपणे जाणून घेऊयात...

किती मांस खातात चिनी?

एका अहवालानुसार, जगात प्राण्यांचं मांस खाणाऱ्या देशांमध्ये चीन अव्वल स्थानी आहे. 1975 पर्यंत चीनमध्ये प्राण्यांचे 70 लाख टन मांस खाल्ले जात होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2018 मध्ये हा आकडा 860 लाख टनांच्या पुढे गेला. या आकडेवारीवरुन चीनमध्ये मांस खाण्याचं प्रमाण मागील काही दशकांमध्ये अत्यंत झपाट्याने वाढलं आहे. मात्र चिनी लोक कोणत्या प्राणाचं मांस अधिक आवडीने आणि जास्त प्रमाणात खातात माहितीये का?

कोणत्या प्राण्याचे मांस सर्वात जास्त खाल्ले जाते

चिनी लोकांना डुकराचे मांस सर्वात जास्त आवडते. डुकराचे मांस म्हणजे पोर्क चिनी लोक अगदी आवडीने खातात. चीनमधील सर्वच प्रांतांमध्ये डुकराचे मांस सर्वात जास्त खाल्ले जाते. अगदी लग्न समारंभांपासून ते वेगवेगळ्या सणांपर्यंत सगळ्याच वेळी चीनमधील लोक आपल्या आहारामध्ये पोर्कचा समावेश असलेल्या पदार्थांचा आवर्जून समावेश करतात. चीनमध्ये डुकराच्या मांसाबद्दल असलेली क्रेझ किती जास्त आहे याचा अंदाज यावरुनच बांधता येईल की चीनमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या मांसापैकी 60 टक्के मांस हे पोर्क म्हणजेच डुकराचे मांस असते. चिनी लोक साधारणपणे मांसाहाराबद्दल बोलत असतात तेव्हा ते पोर्कबद्दलच बोलत असतात असं समजावं.

हे मांस इतक्या मोठ्या प्रमाणात का खाल्ले जाते?

आता इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा चिनी लोक डुकराचेच मांस अधिक प्रमाणात का खातात? असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. चिनी लोक डुकराचे मांस अधिक प्रमाणात खाण्यामागे आर्थिक कारण आहे. सर्वाधिक मांसाहार करणाऱ्या चीन सारख्या देशामध्येही इतर कोणत्याही प्राण्याच्या मांसापेक्षा डुकराचे मांस फारच स्वस्त दरात उपलब्ध असते. म्हणजेच कमी किमतीमुळे डुकराचं मांस विकत घेणाऱ्या ग्राहकांची संख्या आणि त्याचा खाद्यपदार्थांमधील वापर जास्त आहे. तसेच दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, डुकराचे मांस मऊ आणि चवदार असते. अधिक मऊ असल्याने डुकराचे मांस अनेक प्रकारे शिजवता येते. डुकराच्या मांसाव्यतिरिक्त चिनी लोक चिकन, गोमांस, मटण आणि मासेदेखील अगदी आवडीने खातात.

Read More