Marathi News> Lifestyle
Advertisement

महिलांसाठी नव्हे तर पुरुषांसाठी तयार करण्यात आल्या होत्या Heels; जाणून घ्या रंजक इतिहास

History Of Heels: महिलांच्या फॅशनबद्दल बोलताना हिल्सचा उल्लेख होतोच. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या आणि रंगाच्या हिल्स हमखास मिळतात. कोणत्याही कार्यक्रमात किंवा रोजच्या वापरासाठीदेखील महिला हिल्स वापरतात. 

महिलांसाठी नव्हे तर पुरुषांसाठी तयार करण्यात आल्या होत्या Heels; जाणून घ्या रंजक इतिहास

तुम्ही कधीही पुरुषांना हिल्स घातलेलं पाहिलंय का? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हिल्स सुरुवातीला फक्त पुरुषांसाठी बनवले गेले होते. महिलांच्या फॅशनचा हा भाग नंतरच्या काळात झाला. हिल्सचा प्रवास हा फारच रंजक आहे. एका काळी फक्त पुरुषांसाठी तयार करण्यात आलेल्या हिल्स आता महिलांच्या फॅशनचा महत्त्वाचा भाग झाल्या आहेत. जाणून घ्या हिल्सचा हा रंजक प्रवास.

हिल्सचा शोध

हिल्सचा इतिहास 10व्या शतकात सुरू होतो. सुरुवातीला, हिल्सचा वापर पर्शियन घोडेस्वार करीत होते. घोड्यावर स्वार असताना त्यांच्या पायांना रकाबमध्ये स्थिर ठेवण्यासाठी उंच टाच असलेल्या बुटांची गरज होती. या हिल्सची बुटं घालून त्यांना नीट घोडेस्वारी करता येत असे. हळूहळू हा ट्रेंड युरोपपर्यंत पोहोचला आणि 16व्या शतकात पुरुषांच्या फॅशनचा भाग बनला. युरोपमध्ये हिल्स म्हणजे श्रीमंती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जाऊ लागलं. उंच टाचांचे बूट घालणारा माणूस श्रीमंत आणि प्रभावशाली असल्याचं समजलं जात असे. फ्रान्सचा राजा लुई XIV हिल्सचा मोठा चाहता होता. त्याच्या बुटांना लाल रंगाच्या हिल्स असत.

महिलांच्या फॅशनमध्ये हिल्सची एंट्री

17व्या शतकाच्या शेवटी महिलांनीही हिल्स घालण्यास सुरुवात केली. त्या काळात महिलांनी पुरुषांच्या फॅशनमधून प्रेरणा घेतली आणि हिल्स त्यांच्या पोशाखाचा भाग बनल्या. विशेषतः युरोपमध्ये हा ट्रेंड लोकप्रिय झाला. 18व्या शतकात मात्र पुरुषांनी हिल्स घालणं कमी केलं, पण महिलांसाठी त्या खूप विशेष बनल्या. 19व्या आणि 20व्या शतकात हिल्स महिलांच्या स्टाइलचा एक महत्त्वाचा भाग झाल्या. फॅशन डिझायनर्सनी हिल्स वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये तयार करायला सुरुवात केली.

हे ही वाचा: Natural Nail Care: आत्ताच जाणून घ्या नखांना सुंदर आणि लांब बनवण्याचे गुपित

आजकालच्या हिल्स

आजच्या काळात हिल्स हा महिलांच्या फॅशनचा अविभाज्य भाग आहे. त्या केवळ उंची वाढवण्यासाठी नसून, महिलांना आत्मविश्वास आणि ग्लॅमर देतात. आधुनिक काळात स्टाइलसोबतच आरामालाही महत्त्व दिलं जातं. त्यामुळे फ्लॅट हिल्स, वेज हिल्स आणि ब्लॉक हिल्ससारखे पायांना आराम देणारे पर्यायही बाजारात उपलब्ध आहेत.

Read More