Marathi News> Lifestyle
Advertisement

उंचीमुळे तुमचीही मुले मागे पडतात का? मग आतापासूनच त्यांच्या आहारत या '4' पदार्थांचा समवेश करा

मुलांची उंची वाढवण्यासाठी उपयुक्त अन्नपदार्थांचा आहारात समावेश करणे गरजचे आहे. तुमच्या मुलांचीसुद्धा उंची खुंटली असेल तर या 4 पदार्थांविषयी नक्कीच जाणून घ्या.

उंचीमुळे तुमचीही मुले मागे पडतात का? मग आतापासूनच त्यांच्या आहारत या '4' पदार्थांचा समवेश करा

उंची आणि शरिराची ठेवण फ्कत जनुकांवर (Genes) अवलंबून नसते, तर त्यावर जीवनशैली,  शारीरिक हालचाली आणि पोषणसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासून प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपुर आहार दिला, तर त्यांचा शारिरीक विकास चांगला होऊ शकते.
मुलांच्या उंचीवर जनुकांचाही मोठा परिणाम होतो. जर आई-वडील उंच असतील, तर त्यांच्या मुलांची उंची देखील चांगली असण्याची शक्यता असते. मात्र, जर कुटुंबातील बहुतांश लोका उंच नसती, तर मुलांची उंचीही कमीच राहुन जाते.

मुलांची उंची वाढवण्यासाठी उपयुक्त अन्नपदार्थ

1. प्रोटीनयुक्त पदार्थ

अंडी, चिकन, मासे हे प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत. याशिवाय सोयाबीन, बीन्स, डाळी, दही आणि दूध यांसारखे पदार्थदेखील प्रोटीनने समृद्ध असतात. प्रोटीन GF-1 नावाच्या ग्रोथ हार्मोनला वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे मुलांची वाढ खुंटत नाही.

2. पालेभाज्या

ब्रोकली, पालक, शेपू यांसारख्या पालेभाज्या लोह आणि कॅल्शियमने भरलेल्या असतात, ज्यामुळे हाडांची वाढ सुधारते. तसेच, या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन K असते, जे हाडांचा घनत्व टिकवून ठेवण्यास मदत करते. व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराला ताण कमी होतो आणि विकासाला चालना मिळते.

3. बीन्स

बीन्स हे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत. प्रोटीन GF-1 हार्मोनची पातळी वाढवते, ज्यामुळे मुलांच्या वाढीला चालना मिळते. बीन्समध्ये व्हिटॅमिन K, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक यांसारखे घटक असतात, जे हाडांना मजबूत करतात.

4. दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही, पनीर आणि ताक हे कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन B चे चांगले स्रोत आहेत. हे हाडांच्या योग्य विकासासाठी आणि लांबी वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. वाढत्या वयातील मुलांनी रोज दूध पिणे गरजेचे आहे. दुधातील कॅल्शियम हाडे मजबूत करतात आणि लांबी वाढवतात.

हे ही वाचा: किडनी स्टोनचा त्रास 'या' वनस्पतीच्या दोन पानांद्वारे होईल दुर; आत्ताच या उपचाराविषयी जाणून घ्या 

योगासनांनाही दिनचर्येचा भाग बनवा

अन्नपदार्थांसोबतच काही योगासनांचादेखील तुमच्या दिनचर्येत सामवेश करा. आयुर्वेदानुसार, योगमुद्रासन, भुजंगासन, पश्चिमोत्तानासन, कपालभाती, आणि अनुलोम-विलोम यांसारखी योगासने उंची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
मुलांना योग्य पोषण, शारीरिक हालचाल आणि पुरेशी झोप मिळाल्यास त्यांचा शारीरिक विकास उत्तम होईल आणि त्यांची उंची वाढेल.

Read More