Marathi News> Lifestyle
Advertisement

संध्याकाळच्या हलक्या भूकेसाठी बनवा कॅफेसारखा 'चिली चीज टोस्ट'- झटपट आणि चविष्ट!

Easy Recipe: संध्याकाळच्या वेळेस भूक लागल्यावर नेहमीच काय खावं हा प्रश्न पडतो. अनेकवेळा पोळी-भाजी किंवा सँडविच खाण्याचा कंटाळा येतो. अशा वेळी कमी वेळात तयार होणारी, चवदार आणि झटपट रेसिपी म्हणजे चिली चीज टोस्ट तयार करु शकतात. 

संध्याकाळच्या हलक्या भूकेसाठी बनवा कॅफेसारखा 'चिली चीज टोस्ट'- झटपट आणि चविष्ट!

Chilly Cheese Toast: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काहीतरी चविष्ट, चटपटीत खायला आवडतं. हल्ली आपण बाहेरून पिझ्झा, बर्गर किंवा इतर फास्टफूड मागवून खातो. पण यापेक्षा जर तुम्ही घरच्या घरीच कॅफे-स्टाईल चविष्ट डिश बनवली, तर ती आरोग्यासाठीही चांगली आणि खिशालाही परवडणारी ठरेल. अशाच प्रकारातील एक लोकप्रिय आणि झटपट तयार होणारी रेसिपी म्हणजे चिली चीज टोस्ट. ब्रेडपासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांपैकी हा एक सोपा आणि चविष्ट पर्याय आहे. चवदार चीज, कुरकुरीत भाज्या आणि थोडीशी चविष्ट चटणी यामुळे चिली चीज टोस्टला एक वेगळीच चव मिळते. ही डिश इतकी यम्मी असते की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ती आवडतेच. चिली चीज टोस्ट बनवायला वेळही फारसा लागत नाही आणि त्यासाठी लागणारे साहित्यसुद्धा सहज घरात उपलब्ध असतात. संध्याकाळी चहासोबत तर हा एकदम परफेक्ट पर्याय ठरतो. तर जाणून घेऊयात घरच्या घरी कॅफेसारखा चविष्ट चिली चीज टोस्ट बनवण्याची सोपी आणि झटपट रेसिपी.

चिली चीज टोस्टसाठी लागणारे साहित्य:
ब्रेड स्लाईस , किसलेले मोझरेला किंवा प्रोसेस्ड चीज- 1 कप, बटर- 2 टेबलस्पून, चिरलेली हिरवी मिरची- 2, चिरलेला लसूण- १1 चमचा, चिरलेली कोथिंबीर- 1 चमचा,  मीठ, चवीनुसार काळी मिरी, चिरलेले काळे ऑलिव्ह किंवा जेलेपिनोज, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स

कृती:
एका बाऊलमध्ये किसलेले चीज, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, थोडं मीठ, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि बटर घालून सगळं नीट मिक्स करा. एका तव्यावर ब्रेड स्लाईसची एक बाजू थोडी कुरकुरीत होईपर्यंत टोस्ट करा. टोस्ट झालेल्या बाजूवर तयार केलेले चीज मिक्स व्यवस्थित पसरवा. ही स्लाईस परत तव्यावर ठेवा आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर चीज वितळेपर्यंत बेक करा. चीज वितळल्यावर ब्रेडचे तुकडे करा आणि गरमागरम सर्व्ह करा. अधिक चवीसाठी तुम्ही टोस्टवरती ऑलिव्ह, जेलेपिनोज आणि थोडं ऑरिगेनो-चिली फ्लेक्स घालू शकता.

फक्त 10 मिनिटांत तयार
ही डिश तयार होण्यासाठी फक्त 10 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो. झटपट काहीतरी खायचं असेल, पाहुणे अचानक आले असतील किंवा मुलांना टिफिनसाठी काही खास हवं असेल, तर चिली चीज टोस्ट हा एक परिपूर्ण पर्याय आहे.

Read More