Vat Purnima Upwas Recipe: वटपौर्णिमा हा विवाहित महिलांचा सण आहे. यामध्ये नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेला महिलावर्ग आवर्जून उपवास करतात. तींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी पूजा आणि उपवास केला जातो. वट वटपौर्णिमेच्या दिवशी, काही विवाहित महिला निर्जल उपवास करतात आणि वटवृक्षाची विधिवत पूजा करतात. तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. चला या निमित्ताने जाणून घेऊयात उपवासाचे खास पदार्थ कसे बनवायचे?
लागणारे साहित्य
राजगिऱ्याचे पीठ – 1 कप
उकडलेला बटाटा – 1
हिरवी मिरची – 1
सैंधव मीठ – चवीनुसार
तूप किंवा तिळाचं तेल
जाणून घ्या कृती
सर्व साहित्य एकत्र करून थालीपीठासाठी पीठ मळा.
पातळ प्लास्टिक शीटवर थालीपीठ थापून तव्यावर दोन्ही बाजूने तूप टाकून भाजा.
लागणारे साहित्य
पातळ पोहे – 1 कप
दूध – 1 कप
साखर / गूळ – चवीनुसार
वेलदोडा – थोडासा
कृती:
पोहे धुऊन थोडं निथळून घ्या.
दूध गरम करून त्यात पोहे, साखर आणि वेलदोडा घालून एक उकळी द्या.
गरम किंवा गार करून खा.
व्रताच्या दिवशी फळांचा नैवेद्य द्यावा. हा एक उत्तम उपवासाचा पदार्थ आहे.
लागणारे साहित्य
केळं
सफरचंद
पेरू
द्राक्ष
नारळ
कृती
वरील सर्व्ह साहित्य छान किसून साखरेसोबत घालून छान नैवेद्य तयार करा.