गणेश चतुर्थी हा एक उत्सव नाही तर ही एक परंपरा आहे. धार्मिक सणासोबत गणेशोत्सव हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आपुलकीचा सण झाला आहे. या सणाला अगदी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून लगबग सुरु झाली आहे. १० दिवसांच्या गणेशोत्सवाबद्दल अनेक दिवस आधीच भाविकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा गणेशोत्सव सुरु केला तो उद्देश आजही पूर्ण होताना दिसत आहे. गणेशोत्सव फक्त भक्तांनाच नाही तर अनेक कुटुंब, मित्र परिवाराला आणि समाजाला एकत्र जोडतो.
हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून सुरू होते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपते. या वर्षी चतुर्थी तारीख २६ ऑगस्ट रोजी दुपारी ०१:५४ वाजता सुरू होईल आणि २७ ऑगस्ट रोजी दुपारी ०३:४४ वाजता संपेल. उदयतिथीनुसार, हा उत्सव गणेश उत्सव बुधवार २७ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल. अशा परिस्थितीत, गणेश उत्सव सुरू होण्यास फक्त १७ दिवस शिल्लक आहेत. बाप्पा घरी आणण्यापूर्वी किंवा गणेश चतुर्थीला पहिल्यांदाच गणपतीची स्थापना करत असाल तर तुम्हाला काय तयारी करायची आहे ते आधीच जाणून घ्या.
घराची स्वच्छता- गणेश चतुर्थीपूर्वी घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि ज्या वस्तू उपयुक्त नाहीत त्या फेकून द्या. बाप्पाच्या आगमनापूर्वी घर स्वच्छ आणि सकारात्मक असले पाहिजे हे लक्षात ठेवा. विशेषतः पूजा कक्ष, घराचे कोपरे, पूजास्थळ आणि मुख्य दरवाजा स्वच्छ करा.
पूजेचे साहित्य गोळा करा- गणेश चतुर्थी सुरू होण्यापूर्वी, बाजारातून पूजेशी संबंधित सर्व वस्तू आणा आणि गोळा करा. जसे की - पूजा चौकी, चौकोनी कापड, कलश, दिवा, तूप इ.
सजावटीच्या वस्तू- गणपती घरी आणण्यापूर्वी, घराची स्वच्छता तसेच सजावट आवश्यक आहे. म्हणून, रांगोळी बनवण्यासाठी अबीर, दिवे, तोरण इत्यादी स्वच्छतेच्या वस्तू आगाऊ आणा आणि गोळा करा.
फराळाची तयारी - तुुमच्या घरी बाप्पा किती दिवस विराजमान होणार आहे त्या दृष्टीकोनातून फराळाची तयारी करा. फराळ घरी तयार केलात तर त्याची लज्जत वेगळी असते. तसेच या दिवसांचा घरात पारंपरीक पदार्थांचा मेनू देखील तयार करुन ठेवा.
यादी - गणेशोत्सवाच्या काळात यादी महत्त्वाची आहे. मग ती पाहूण्यांची असो, कामाची असो किंवा आपल्या खास पारंपरीक वेशभूषेची असो. सगळ्या यादी तयार करुन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
प्रश्न: गणेश चतुर्थी किती दिवस साजरी केली जाते?
उ. गणेशोत्सव साधारणपणे १० दिवस चालतो.
उ. गणपती विसर्जन कधी केले जाते?
उ. गणेश चतुर्थीच्या १० व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला, गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते.
उ. गणपती प्रतिष्ठापनेसाठी कोणती दिशा शुभ आहे?
उ. गणपती प्रतिष्ठापनेसाठी ईशान्य (ईशान कोन) ही दिशा सर्वात शुभ मानली जाते.