Marathi News> Lifestyle
Advertisement

GK Quiz : असं कोणतं गाव आहे जिथे एकही अविवाहित तरुण नाही आणि लग्नासाठी तरुणी करतात 'हे' काम!

GK Trending Quiz : भारतातील बहुतेक स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. आजच्या जगात तुम्हाला सामान्य ज्ञानाचे प्रश्नांची उत्तरं माहिती असणे गरजेचे आहे.   

GK Quiz : असं कोणतं गाव आहे जिथे एकही अविवाहित तरुण नाही आणि लग्नासाठी तरुणी करतात 'हे' काम!

General Knowledge Trending Quiz : भारतातील बहुतेक स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारलेच जातात. म्हणूनच, आम्ही तुमच्यासाठी दररोज प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपात 10 अद्वितीय सामान्य ज्ञानाचे प्रश्न घेऊन आलो आहोत. जे अजिबात सोपे नाहीत, पण असे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये अनेकदा विचारले जातात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही भविष्यासाठी सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे देखील लिहून ठेवू शकता.

प्रश्न 1 : माउंट एव्हरेस्टवर चढणारा पहिला व्यक्ती कोण होता?

उत्तर: माउंट एव्हरेस्टवर चढणारा पहिला व्यक्ती 'तेनझिंग नोर्गे' होता.

प्रश्न 2 : 'ए मेरे वतन के लोगों' हे देशभक्तीपर गीत कोणी लिहिलं?

उत्तर: 'ए मेरे वतन के लोगों' हे देशभक्तीपर गीत कवी प्रदीप यांनी लिहिलं होतं.

प्रश्न 3 : भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होतं?

उत्तर: भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान 'क्लेमेंट अ‍ॅटली' होतं.

प्रश्न 4 : कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता म्हणतात?

उत्तर: ज्या व्यक्तीचा रक्तगट O- (O निगेटिव्ह) असतो त्याला सार्वत्रिक दाता म्हणतात.

प्रश्न 5 : चंद्रावरून पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो?

उत्तर: चंद्रावरून पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहोचण्यासाठी 3 सेकंद लागतात.

प्रश्न 6 : कोणत्या देशाला नाईल नदीची देणगी म्हटलं जातं?

उत्तर: इजिप्तला नाईल नदीची देणगी म्हटलं जातं.

प्रश्न 7 : भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे?

उत्तर: भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न आहे.

प्रश्न 8 : भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते?

उत्तर: भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. भीमराव आंबेडकर आहेत.

प्रश्न 9 : कांगारू हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय प्रतीक आहे?

उत्तर: कांगारू हे ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय प्रतीक आहे.

प्रश्न 10 : जगातील असे कोणते गाव आहे जिथे एकही अविवाहित मुलगा नाही?

उत्तर: ब्राझीलमधील नोवा दो कॉर्डेइरो हे असे गाव आहे जिथे एकही अविवाहित मुलगा नाही. येथील महिला पुरुषांना पैसे देऊन लग्न करण्यास तयार असतात.

Read More