Marathi News> Lifestyle
Advertisement

टॉवेलच्या बॉर्डरला पट्ट्या का असतात? 99 टक्के लोकांना उत्तर माहिती नसेल

Trending News In Marathi: आपल्या घरात असलेल्या टॉवेलवर बॉर्डरला दोन पट्ट्या का असतात याचा कधी विचार केला आहे का? जाणून घेऊया कारण 

टॉवेलच्या बॉर्डरला पट्ट्या का असतात? 99 टक्के लोकांना उत्तर माहिती नसेल

Trending News In Marathi: सर्वच घरात टॉवेलचा दररोज उपयोग केला जातो. वॉशरुम, किचन असो किंवा जीममध्ये जाण्यासाठीदेखील टॉवेलचा वापर केला जातो. आपल्या रोजच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक म्हणजे टॉवेल. बाजारात महागातून महाग तर स्वस्तातील स्वस्त टॉवेल मिळतात. काही टॉवेल हे नरम असतात तर काही खूप रफ असतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का? टॉवेलच्या दोन्हीबाजूला एक पट्टी असते. ही पट्टी का असते हे तुम्हाला माहितीये का? 

टॉवेलच्या बॉर्डरला ही पट्टी का असते हे ९९ टक्के लोकांना माहिती असते. टॉवेलच्या बॉर्डरला असलेली ही पट्टी वेगवेगळी असू शकते. काही टॉवेलमध्ये सरळ, कधी झिगझॅग तर कधी खूप सॉफ्ट अशी पट्टी असते.काही जणांच्या मते या पट्ट्या सजावटीसाठी असतात. तर काही जणांच्या मते या पट्ट्याचा काहीच उपयोग नसतो. काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया Xवर एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. यावर या टॉवेलच्या पट्टीबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला याबाबत खरी माहिती देणार आहोत. 

सॉफ्टवेअर इंजिनिअर नॅच मॅकग्रेडीने १४ मार्च रोजी एक ट्विटर पोस्ट शेअर केली आहे. टॉवेलवरील बॉर्डर जाणूनबुजून अशी बनवली जाते का? जेणेकरुन टॉवेल लवकर आकसला जाईल आणि नवीन खरेदी करावा लागेल? या प्रश्नावर लोकांनी अनेक मजेदार उत्तर दिले आहेत. मात्र काही जणांनी खरी माहिती शेअर केली आहे. 

टॉवेलच्या दोन्ही बाजूंना असलेल्या पट्टीला डॉबी बॉर्डर असं म्हणतात. ही विशेष प्रकारचे विणकाम असतात. ही टॉवेलच्या शेवटी ही पट्टी असते. ही बॉर्डर टॉवेलच्या डिझाइनला खास लूक देतात. 

जर टॉवेलच्या चारही बाजूंना पट्टी नसेल तर काहीच दिवसांत टॉवेलमधून धागे निघू लागतात. या पट्टी टॉवेलची पकड मजबूत करते आणि दीर्घकाळापर्यंत टॉवेल टिकतो. टॉवेलची पट्टी थोडी वेगळी दिसते. या बाजूनेच जास्त अंग पुसण्यात येते. त्यामुळं शरीरावरील पाणी जास्त शोषून घेण्यात येते. आपण टॉवेल महिन्यातून दोनदा जास्त मशीनमध्ये धुवायला टाकतो. अनेकदा मशीनमध्ये स्पीन केल्यामुळं टॉवेल फाटू शकतो. मात्र या पट्ट्यांमुळं टॉवेल मजबूत राहतो व टॉवेल धुतल्यानंतरही खराब होत नाही. 

Read More