Hair Growth Tip : सगळ्यांची इच्छा असते की त्यांना मजबूत, लांब आणि दाट केस असावेत. त्यासाठी लोकं काय काय करतात. होम रेमीडीजपासून वेगवेगळे केमिकल देखील वापरतात. अनेक लोकं तक्रार करताना दिसतात की त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे केस वाढत नाहीत. काही काळानंतर केस वाढतच नाहीत. जर तुम्ही देखील या समस्येनं त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हेअर एक्सपर्ट्स नेमकं काय बोलतात याविषयी जाणून घेऊया.
या सगळ्या गोष्टींना घेऊन लोकप्रिय डर्मेटोलॉजिस्ट अर्थात त्वचा रोग तज्ञ आणि हेअर एक्सपर्ट अंकुर सरीन यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हेअर एक्सपर्टनं 3 सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. ज्या मेडिकलप्रमाणे केसांच्या वाढीत महत्त्वाचं काम करतात. डॉ, सरीन यांच्या माहितीनुसार, ही पद्धत ना फक्त केसांच्या ग्रोथसाठी मदगार आहे तर त्यानं तुमचे केस आणखी मजबूत देखील राहतील.
त्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या डायटमध्ये आयरन आणि फोलिक अॅसिडचं प्रमाण वाढवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. तर डॉ. अंकुर सरीन यांच्या माहितीनुसार, आयरन आणि फॉलिक अॅसिड तुमच्या हेअर सेल्सला वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरते. अशात केस लांब हवे असतील तर आयरन आणि फॉलिक अॅसिडला आहारात वाढवण्याचा सल्ला दिला आहे.
डॉ. सरीन यांच्या माहितीनुसार, जर तुम्हाला लवकरात लवकर तुमचे केस वाढावे असे वाटत असेल तर एक्सपर्ट्सनुसार, मिनोक्सिडिलचा वापर करू शकतात. मिनोक्सिडिल एक खास प्रकारतं औषध आहे. जे ब्लड वेसल्सला ओपन करते आणि हेयर फॉलिकल्समध्ये रक्त पुरवण्याचं काम करते. ज्यामुळे केस मजबूत होतात आणि केसांची वाढही होते.
या सगळ्याशिवाय केसांच्या वाढीसाठी ग्रोथ प्रोटीनचा देखील फायदा होता. त्यासाठी तुम्ही हेअर एक्सपर्टचा सल्ला दिला आहे. त्यावेळी त्यांनी रेडेन्सिल आणि एनागॅनसारख्या पेप्टाइड-बेस्ड क्लिनिकल ट्रीटमेन्टची मदत घेऊ शकतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)