Marathi News> Lifestyle
Advertisement

Hair care: पावसाळ्यात केस गळती वाढलीये? घरीच बनवा 'हा' नैसर्गिक शॅम्पू, लवकरच जाणवेल फरक

Monsoon Hair Care: महागडे आणि केमिकलयुक्त शॅम्पू वापरण्याऐवजी तुम्ही घरीच एक नैसर्गिक आणि परिणामकारक शॅम्पू तयार करू शकता.  

Hair care: पावसाळ्यात केस गळती वाढलीये? घरीच बनवा 'हा' नैसर्गिक शॅम्पू, लवकरच जाणवेल फरक

How to make natural shampoo at home: कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा जरी आल्हाददायक असला, तरी या सिजनमध्ये केसांची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. दमट हवामान, सतत आर्द्रता आणि पावसाचं पाणी यामुळे केस मुळांपासून कमकुवत होतात, मूळ कमकुवत झाली की ती  झपाट्याने गळायला लागतात. यावर उपाय म्हणून महागडे आणि केमिकलयुक्त शॅम्पू वापरण्याऐवजी तुम्ही घरीच एक नैसर्गिक आणि परिणामकारक शॅम्पू तयार करू शकता. हा शॅम्पू तयार करण्यासाठी लागणारी सामग्री घरच्या घरी सहज मिळणारी आहे आणि याचा वापर केल्यास केस गळती कमी होते, टाळू स्वच्छ राहते आणि केस मऊ व चमकदार होतात. चला तर मग जाणून घेऊयात  नैसर्गिक शॅम्पू बनवण्याची पद्धत... 

 नैसर्गिक शॅम्पू बनवण्याची लागणारे साहित्य:

१ कप रीठा 

१/२ कप शिकेकाई

१/२ कप आवळा (कोरडा)

३-४ कढीपत्ता

२-३ लवंग (ऐच्छिक)

कृती:

सर्व साहित्य एकत्र करून २ कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी हे मिश्रण मंद आचेवर १५-२० मिनिटं उकळा. मिश्रण गार झाल्यावर ते चांगलं गाळा. तयार झालेला द्रव म्हणजेच तुमचा नैसर्गिक शॅम्पू!

काय  फायदे मिळतात? 

केमिकल फ्री आणि सौम्य शॅम्पू

केस गळतीवर प्रभावी

डोकं आणि केस स्वच्छ ठेवतो

केसांना नैसर्गिक चमक व मऊपणा देतो

डँड्रफ आणि खाज कमी करतो

हा शॅम्पू आठवड्यातून 2 वेळा वापरल्यास केस गळती स्पष्टपणे कमी होते. पावसाळ्यात केसांची योग्य निगा राखण्यासाठी हा घरगुती उपाय खूपच उपयुक्त ठरतो. त्यामुळे या पावसात केसांचं सौंदर्य टिकवण्यासाठी नैसर्गिक उपायांचा वापर करा. 

Read More