Health Benefits of Pomegranate : डाळिंब हे फळ अनेकांचं आवडीचं आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त याची चव चांगली नाही तर त्यासोबत त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. डाळिंबमध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टिऑक्सिडंट्स, व्हिटामिन्स आणि फायबर असतात. डाळिंब खाल्यानं फक्त पचन क्रिया चांगली होत नाही तर त्यासोबतच रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते.
अनेकांना वाटतं की डाळिंब हे उन्हाळी फळ आहे. पण हे फळ तुम्हाला वर्षभर मिळतं. आयुर्वेद, ट्रेडिशनल चीनी मेडिसिनमधून एक गोष्ट समोर आली आहे की याच्या गोड आणि तुरट चवीमुळे त्याच्यात थंडावा असतो. यामुळे पित्ताची समस्या कमी होती. त्यामुळे रोज सकाळी एक वाटी डाळिंब खाऊन दिवसाची सुरुवात करा. यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतील.
डाळिंबमध्ये पनिकलॅगिन्स आणि अॅथोसाइनिन्ससारखे पावरफुल अॅन्टी ऑस्कीडंट्स असतात. हे आपल्या शरिराला फ्री रेडिकल डॅमेज आणि ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात. त्यामुळे त्वचेत तजेलदारपणा येतो आणि वाढत्या वयाचे परिणाम हे कमी करण्यास मदत होते.
डाळिंबचं नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल संतुलित करण्यास आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते. त्यात अॅन्टी इन्फेमेटरी गुण आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते.
डाळिंबामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचन क्रिया सुधरते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील राहत नाही. त्यातील पॉलीफेनॉल जळजळ कमी करतं आणि हे आतड्याच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयबीएस आणि क्रोन्य रोगातही मदतगार ठरतं.
डाळिंबमध्ये व्हिटामिन C आणि K पोटॅशियम आणि इतर गरजेची पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात. प्रतिरोधक क्षमता वाढवते आणि सर्दी-खोकला असेल तर त्या काळातही तुम्हाला डाळिंब मदतगार ठरतं.
त्यामुळे आता तुमच्या आहारात डाळिंबचा समावेश नक्कीच करा. जेणे करून फक्त तुमच्या त्वचेवर ग्लो येणार नाही तर त्यासोबत तुमच्या आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतील.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)