Marathi News> Lifestyle
Advertisement

श्वास कसा घ्यावा हे शिकण्यासाठी खर्च करतो 3.5 लाख, आरोग्यासाठी कोट्यवधींची नोकरी सोडून...; हा भारतीय आहे कोण?

CEO Spends 3.5 Lakhs On Breathing Classes: 'मायक्रोसॉफ्ट'सारख्या नामांकित कंपनीमधील नोकरी या व्यक्तीने आरोग्यासंदर्भातील कारण देत सोडली. वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी निवृत्ती जाहीर केल्यानंतर या व्यक्तीने काय केलं जाणून घ्या...

श्वास कसा घ्यावा हे शिकण्यासाठी खर्च करतो 3.5 लाख, आरोग्यासाठी कोट्यवधींची नोकरी सोडून...; हा भारतीय आहे कोण?

CEO Spends 3.5 Lakhs On Breathing Classes: अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या सीईओने अलिकडेच खुलासा केला आहे की, तो बेंगळुरूमध्ये श्वासोच्छवासाच्या कार्यशाळांवर दरवर्षी साडेतीन लाख रुपये खर्च करतो. आयआयट मद्रासचा माजी विद्यार्थी असलेल्या या व्यक्तीने एक विशेष मुलाखत दिली आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण? आरोग्याचं कारण देत कोट्यवधींचा जॉब सोडून वयाच्या 39 व्या वर्षी निवृत्तीमागे या व्यक्तीचं लॉजिक काय आहे? पाहूयात...

स्वत: केला खुलासा

तुम्ही आतापर्यंत गायनाच्या क्लासबद्दल ऐकलं असेल, स्वयंपाकाच्या क्लासबद्दल ऐकलं असेल, वेगवेगळ्या खेळांच्या क्लासबद्दल ऐकलं असेल, पण कधी श्वास घेण्यासाठी एखादी व्यक्ती प्रशिक्षण घेतेय असं ऐकलंय का? आता तुम्ही म्हणाल की हा काय विचित्र प्रश्न आहे. मात्र एक व्यक्ती दरवर्षी 3.5 लाख रुपये श्वास कसा घ्यायचा यासंदर्भातील कार्यशाळेवर खर्च करते. हा खुलासा स्वत: या व्यक्तीने केलाय.

कोण आहे हा भारतीय?

अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानेच हा खुलासा करताना, श्वासोच्छवास कसा करावा यासंदर्भातील बंगळुरुमधील कार्यशाळांवर वर्षाला 3.5 लाख रुपये मी खर्च करतो असं म्हटलंय. 'बिझनेस इनसाइडर'ला आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी असलेल्या सुधीर कोनेरू यांनी हा खुलासा केला आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये 15 वर्ष यशस्वी वाटचाल केल्यानंतर, 'स्व‍त्वाचा शोध घेण्यासाठी' आणि आरोग्यासंदर्भातील नव्या प्रवासासाठी निवृत्ती घेतल्याचं सुधीर सांगतात. आता सुधीर स्वत:च्या आरोग्यासंदर्भात गुंतवणूक करण्यासाठी वेळ देत आहेत.

सध्या काय करतेय ही व्यक्ती?

वर्षाला साडेतीन लाख रुपये केवळ श्वासोश्वासांच्या कार्यशाळेवर खर्च करणाऱ्या सुधीर यांचा दृष्टीकोन अत्यंत वेगळा असल्याचं दिसून येतं. सध्या सुधीर हे अमेरिकेतली सिएटल फिटनेस सेंटर, स्पा आणि सलूनसाठी वापरल्या जाणाऱ्या 'झेनोटी' नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीचं नेतृत्व करत आहेत.

एका सेशनची फी 1 लाख 60 हजार रुपये

56 वर्षीय कोनेरू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा ते बेंगळुरू येथील एका केंद्रात चार दिवसांच्या श्वसन कार्यशाळांना उपस्थित राहतात. या कार्यशाळांमध्ये दोन तासांचे ध्यान आणि श्वासोच्छवासासंदर्भातील सत्रांमध्ये विशिष्ट आध्यात्मिक श्वासोच्छवासाच्या पद्धती शिकवल्या जातात. या प्रत्येक कार्यशाळेची फी 1 लाख ते 1 लाख 60 हजार रुपयांदरम्यान आहे. मात्र दर अधिक वाटत असेल तरी हे फारच परिणामकारक असल्याचं सुधीर सांगतात. "हे उपचारात्मक पद्धत म्हणून आश्चर्यकारक फायदे देणारं आणि तितकेच शक्तिशाली आहे," असं सुधीर म्हणाले.

वयाच्या 39 व्या वर्षी घेतलेली निवृत्ती

कॉर्परेट क्षेत्रामध्ये सुधीर यांनी 1992 मध्ये पाऊल टाकलं. वयाच्या 39 व्या वर्षी मायक्रोसॉफ्टमधून निवृत्ती घेणाऱ्या सुधीर यांनी 1992 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये उत्पादन व्यवस्थापक म्हणून कॉर्परेट क्षेत्रातील प्रवास सुरू केला. त्यानंतर 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला सुधीर यांनी स्वतःची कंपनी, इंटेलिप्रेप सुरू केली. 2008 मध्ये वयाच्या 39 व्या वर्षी वैयक्तिक आरोग्य, योग, पॉवर ट्रेनिंग, धावणे या गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी उमेदीच्या काळात निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. "मी आर्थिकदृष्ट्या ज्या ठिकाणी पोहोचलो होतो तिथे मी आनंदी होतो. माझे ध्येय माझ्या वैयक्तिक कल्याणाभोवती आणि माझ्या कुटुंबासोबत राहण्याभोवती होते," असं सुधीर यांनी मुलाखतीत सांगितलं. फक्त पैसे कमविण्यापलीकडे "माझ्या अस्तित्वाचा सखोल... अर्थ" शोधण्याचा माझा मानस आहे, असंही ते म्हणाले. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर, सुधीर त्यांच्या वयाच्या 41 व्या वर्षी म्हणजेच सन 2010 मध्ये निवृत्तीतून बाहेर आले आणि त्यांनी 'झेनोती' नावाची कंपनी सुरु केली.

कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यदायी धोरण

कामाच्या ठिकाणी निरोगी राहण्याला प्राधान्य देण्याचं सुधीर यांच्या कंपनीच्या धोरणांचा भाग आहे. म्हणूनच या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना धावण्याच्या, चालण्याच्या किंवा पोहण्याच्या प्रत्येक नव्या यशसाठी आर्थिक बक्षिसे दिली जातात. कर्मचाऱ्यांना स्पा आणि सलून, नाश्ता आणि समुपदेशन सत्रांची सुविधा पुरवली जाते. "आरोग्य म्हणजे सिक्स-पॅक असणं असं होतं नाही. आरोग्य म्हणजे पूर्ण संतुलन राखणे आणि तुमच्या पूर्ण क्षमतेनुसार जगण्यास तुम्हाला सक्षम बनवणे याबद्दल आहे," असं सुधीर सांगतात.

दरवर्षी ट्रीपला जातात

दररोज 10 ते 12 तास तणावपूर्ण भूमिकेत काम करूनही सुधीर त्यांच्या क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी आरोग्याला प्राधान्य देतात. सुधीर सामान्यतः दररोज सकाळी सात वाजता उठतात. अगदी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील योग करतात आणि त्याचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक आरोग्य खर्च करण्यासाठी ते वर्षातून एक महिनाभर बालीमध्ये भटकंती करतात. याचा खर्च सुमारे 13 लाख रुपये आहे. या ठिकाणी ते योगासहीत मालिश आणि साउंड बाथसारख्या उपचारांवर लक्ष केंद्रित करतात.

FAQ

1) सुधीर कोनेरू कोण आहेत?

सुधीर कोनेरू हे भारतीय वंशाचे, अमेरिकेत राहणारे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. ते आयआयटी मद्रासचे माजी विद्यार्थी असून, मायक्रोसॉफ्टमध्ये 15 वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली. सध्या ते 'झेनोटी' नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीचे नेतृत्व करतात, जी सिएटलमधील फिटनेस सेंटर, स्पा आणि सलूनसाठी वापरली जाते.

2) सुधीर कोनेरू यांनी श्वासोच्छवासाच्या कार्यशाळांवर किती खर्च केला?

सुधीर कोनेरू बेंगळुरूमध्ये श्वासोच्छवासाच्या कार्यशाळांवर दरवर्षी साडेतीन लाख रुपये खर्च करतात. या कार्यशाळांमध्ये चार दिवसांचे सत्र असते, ज्यामध्ये दोन तासांचे ध्यान आणि आध्यात्मिक श्वासोच्छवासाच्या पद्धती शिकवल्या जातात. प्रत्येक सत्राची फी 1 लाख ते 1 लाख 60 हजार रुपये आहे.

3) सुधीर कोनेरू यांनी मायक्रोसॉफ्टमधून निवृत्ती का घेतली?

सुधीर यांनी वयाच्या 39 व्या वर्षी मायक्रोसॉफ्टमधून निवृत्ती घेतली, कारण त्यांना स्वतःच्या वैयक्तिक आरोग्याला, योगाला, पॉवर ट्रेनिंगला आणि धावण्याला प्राधान्य द्यायचे होते. त्यांनी सांगितले की, ते आर्थिकदृष्ट्या समाधानी होते आणि त्यांचे ध्येय वैयक्तिक कल्याण आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यावर केंद्रित होते.

Read More