Marathi News> Lifestyle
Advertisement

गरजेपेक्षा जास्त चहा प्यायल्याने वंध्यत्व येते? आरोग्यतज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Does Caffeine Affect Fertility: कॅफीनचा आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो. तसंच, महिलांमधील वंध्यत्व असे प्रकारही घडण्याची शक्यता आहे. 

गरजेपेक्षा जास्त चहा प्यायल्याने वंध्यत्व येते? आरोग्यतज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Does Caffeine Affect Fertility: चहाच्याबाबतीत अनेक समज-गैरसमज आहेत. चहा प्यायल्याने चेहरा काळा पडतो किंवा ओठ काळे होतात, अशाही काही समजूती आहेत. त्याचबरोबर अतिप्रमाणात चहा प्यायल्याने महिलांमध्ये वंध्यत्व येते, अशाही काही मान्यता आहेत. मात्र या दाव्यात किती तथ्य आहे? हे आज आपण जाणून घेऊया. 

चहा-कॉफी किंवा अनेक पेयांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफीन असते. कॅफीन हा हळूहळू आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनत चालला आहे. अनेक जण दिवसातून चार ते पाच वेळा  चहा-कॉफी पितात जी आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. अनेक संशोधनातून समोर आले आहे की, अतिप्रमाणात चहा प्यायल्याने प्रजानन क्षमतेवर वाईट परिणाम होतो. 

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही संपूर्ण दिवसांत 200 मिलीग्रॅम कॅफीन घेत असाल तर त्याचा तुमच्या प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र जर तुम्ही 300 मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅफीनचा वापर करत असाल तर त्याचा प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने महिलांना गर्भ राहण्यास समस्या निर्माण होऊ शकतात. याच कारणामुळं पुरुषांमध्ये स्पर्म काउंट आणि त्याच्या क्वॉलिटीवरही वाईट परिणाम होऊ शकतो. 

आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅफीन हा असा पदार्थ आहे. जो तुमच्या मज्जातंतूला अॅक्टिव्ह करण्याबरोबरच संपूर्ण शरीरात उर्जा निर्माण करते. इतकंच नव्हे तर ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासही मदत करते. मात्र जेव्हा कॅफीन आणि प्रजानन क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास जर तुमचे वय 35-40 च्या दरम्यान असेल तर तुम्ही गरजेपेक्षा जास्त कॅफीन पित असाल तर त्याचा परिणाम थेट फर्टिलिटीवर होतो. पुरुष आणि महिलांमध्ये कॅफीनचा परिणाम वेगवेगळा होऊ शकतो. 

कॅफिनचा वाईट परिणाम हा महिलांच्या आरोग्यावर अधिक होऊ शकतो. महिला कॅफिनचा अतिवापर करत असतील तर त्याचा थेट परिणाम ओव्यूलेशनवर होऊ शकतो. ओव्हरीतील अंडी फुटून बाहेर येण्याची प्रोसेस स्लो होऊ शकते. इतकंच नव्हे तर यामुळं कंन्सिव करण्यासही अडथळे येऊ शकतात. जर गरोदरपणात अतिप्रमाणात चहा किंवा कॉफीचे सेवन केले तर त्याचा परिणाम मिसकॅरेज आणि प्री मॅच्युअर बर्थचा धोका वाढतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More