Marathi News> Lifestyle
Advertisement

माणसांपेक्षा प्राण्यांचे दात शुभ्र आणि मजबूत कसे राहतात? 'या' टिप्स तुमच्याही येतील कामी!

आपण दररोज दोन वेळा ब्रश करतो, तोंडाची स्वच्छता राखतो, महागड्या टूथपेस्ट वापरतो, पण तरीही काही काळानंतर आपल्या दातांवर पिवळेपणा दिसू लागतो. अनेकदा डेंटिस्टकडेही जावं लागतं. हा अनुभव प्रत्येकालाच कधीतरी आलेला असतो.    

माणसांपेक्षा प्राण्यांचे दात शुभ्र आणि मजबूत कसे राहतात? 'या' टिप्स तुमच्याही येतील कामी!

आपण काहीही खाल्ले तरीही आपल्या दातांचा रंग लगेच वेगळा दिसू लागतो आणि कालांतराने तो पिवळा पडू लागतो. पण प्राणी दिवसभर काहीही खातात, घाणेरडं पाणी पितात, कधीच दात घासत नाहीत. तरी त्यांचे दात इतके पांढरे, चमकदार आणि मजबूत राहतात. त्यांच्या दातांना किडही का लागत नाही. नेमकं काय असेल या मागील कारण जाणून घेऊयात सविस्तर.

आपल्या खाण्याच्या सवयींमुळे दात पिवळे होतात
आपण जे अन्न खातो. त्याचा थेट परिणाम आपल्या दातांवर होतो. चहा, कॉफी, साखर, सॉफ्ट ड्रिंक्स, प्रोसेस्ड फूड, तंबाखू, धूम्रपान अशा अनेक गोष्टी दातांचा रंग खराब करतात. विशेष म्हणजे तंबाखूमध्ये असणारे टार आणि निकोटीन दात पिवळे होण्याचे प्रमुख कारण आहेत. याशिवाय आपण खातो ते अन्न शिजवलेलं, मऊ आणि कमी तंतुमय असतं. त्यामुळे चावायला जास्त मेहनत लागत नाही आणि त्यामुळे दातांची नैसर्गिक स्वच्छता होत नाही. उलट अन्नाचे अवशेष दातांमध्ये अडकतात आणि बॅक्टेरिया तयार होतात.

प्राण्यांचे दात कायम चमकदार आणि निरोगी का राहतात?

प्राण्यांच्या दातांमध्ये कधी पिवळेपणा दिसत नाही, किड लागत नाही आणि ते सहजपणे पडतही नाहीत. यामागे काही नैसर्गिक कारणं आहेत:

1. नैसर्गिक आणि तंतुमय आहार:  
प्राणी निसर्गात उपलब्ध असलेलं अन्न खातात. जसं की गवत, पाने, मांस, हाडं, फळं, झाडांची सालं इ. हे सगळं अन्न चावून खावं लागतं. त्यामुळे दातांवर जमा झालेला मळ आपोआप घासून निघतो.

2. सलग चावण्यामुळे स्वच्छता:
प्राणी दीर्घकाळ अन्न चावत राहतात. त्यामुळे त्यांचे दात नैसर्गिकरित्या स्वच्छ राहतात. हे एक नैसर्गिक ब्रशसारखंच काम करतं.

3. औषधी गुणधर्म असलेले घटक:  
झाडांची साल, काही औषधी वनस्पतींचं सेवन यामुळे त्यांच्या तोंडात बॅक्टेरिया वाढत नाहीत. काही झाडांच्या सालीत जंतुनाशक गुणधर्म असतात. जे दातांना सुरक्षित ठेवतात.

4. कोणतेही कृत्रिम रसायन नाही: 
प्राण्यांच्या आहारात कुणतेही कृत्रिम गोडी, साखर, रसायने नसतात. त्यामुळे त्यांच्याकडे दातांच्या सडण्याचा किंवा पिवळेपणाचा प्रश्न उद्भवत नाही.

आपण दातांची काळजी कशी घ्यावी? 
- साखर आणि तंबाखू टाळा.
- अधिक तंतुमय आहार घ्या (जसे की गाजर, सफरचंद, काकडी)  
- दररोज ब्रशबरोबरच फ्लॉसिंग करा.  
- दात घासण्यासाठी नैसर्गिक टूथपावडर किंवा कोळशाची पावडर वापरा.
- दर सहा महिन्यामध्ये डेंटिस्टकडे तपासणीसाठी जा.  

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
Read More