Marathi News> Lifestyle
Advertisement

तुपात भाजून की दुधात शिजवून...मखाना खाणे कसे आहे जास्त फायदेशीर? जाणून घ्या योग्य पद्धत

Best Way to Eat Makhana: मखाना अनेकांना तुपात भाजून मखाना खायला आवडतो, तर अनेकांना दुधात शिजवून खायला आवडतो. मखाना खाण्याच्या या दोन पद्धतींपैकी कोणता अधिक फायदेशीर ठरू शकतो हे जाणून घेऊयात.  

तुपात भाजून की दुधात शिजवून...मखाना खाणे कसे आहे जास्त फायदेशीर? जाणून घ्या योग्य पद्धत

Makhana Eating Benefits: मखाना हा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. याच्या सेवनाने शरीरातील अनेक प्रकारचे आजार दूर होण्यास मदत होते. अनेकदा डॉक्टरही मखाना खायला सांगतात. मखाना म्हणजे कमळाच्या बिया. या बिया भाजून मखाना तयार केला जातो.  मखानामध्ये कॅलरीज कमी असतात आणि प्रथिने आणि फायबर भरपूर असतात. याच्या सेवनाच्या अनेक पद्धती आहेत. आपण आज कोणती पद्धत उत्तम आहे याबद्दल जाणून घेऊयात. अनेकांना तुपात भाजून मखाना खायला आवडतो, तर अनेकांना दुधात शिजवून खायला आवडते. मखाना खाण्याच्या या दोन पद्धतींपैकी कोणता अधिक फायदेशीर ठरू शकतो ते जाणून घेऊया.

दुधात शिजवलेले मखाना खाण्याचे फायदे काय आहेत? 

दुधात कॅल्शियम आढळते. जेव्हा तुम्ही दुधात भिजवलेले मखाना खाता तेव्हा शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते. 
दुधात शिजवलेले मखाना खाण्यामुळे जे दात आणि हाडांसाठी फायदेशीर असते.
अशापद्धतीने मखाना खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा दूर होतो. 
यामुळे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मिळते जे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते.
दुधात शिजवलेले मखाना हे पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण त्या मखानामध्ये भरपूर फायबर असतात.

तुपात भाजलेले मखाना खाण्याचे फायदे काय आहेत? 

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुपात भाजलेला मखाना तुमच्यासाठी बेस्ट आहे. पण एक लक्षात घ्या की कमी प्रमाणात तूप घाला. 
तुपात भाजलेले मखाणे पचायला सोपे असते.
तुपातला मखानामध्ये अँटी-ऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More