Marathi News> Lifestyle
Advertisement

अंड न फोडताही खराब झालंय कसं ओळखायचं? जाणून घ्या सर्वात सोपी ट्रिक

Egg Hack: फिटनेस इन्फ्लुएन्सरने चांगलं आणि खराब अंड यातील फरक कसा ओळखायचं हे सांगितलं आहे.   

अंड न फोडताही खराब झालंय कसं ओळखायचं? जाणून घ्या सर्वात सोपी ट्रिक

अंड्याचा अनेकजण दैनंदिन आहारात समावेश करतात. सकाळी नाश्त्याला अनेकजण उकडलेलं अंड, ऑम्लेट खातात. याशिवाय केकपासून ते कुकीज अनेक पदार्थांसाठी तो प्रमुख घटक आहे. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली तसंच दुकानातून खरेदी केलेली अंडी बराच काळ ताजी राहतात. पण अनेकदा यातील काही अंडी खराब झालेली असतात. पण अंड्यावर ते खराब झाल्याची कोणतीही खून दिसत नाही. अनेकदा ते फोडल्यानंतर खराब झाल्याचं समजतं, ज्यामुळे पंचाईत होते. पण तुम्ही अंड न फोडताही ते खराब झालं आहे की नाही हे तपासू शकता.

सोशल मीडियावर फिटनेस स्पेशलिस्ट प्रणव जांदियालने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये खराब अंड ओळखण्याची ट्रिक सांगण्यात आली आहे. त्यानुसार, फक्त मोबाईलच्या फ्लॅशलाईटचा वापर करुन तुम्ही अंड चांगलं आहे की खराब हे ओळखू शकता. 

आधी तुमच्या मोबाईलची फ्लॅशलाईट सुरु करुन फोन उलटा ठेवा. यानंतर त्या लाईटवर अंड ठेवा. जर अंड्याच्या आतून पिवळा प्रकाश येत असेल तर ते ताजं आणि सुरक्षित आहे. पण जर फ्लॅशलाईटवर ठेवल्यानंतरही काही लाईट दिसत नसेल तर ते खराब झाल्याचं लक्षण आहे. आपली ही पद्धत सिद्ध करण्यासाठी त्याने डेमो करुनही दाखवला आहे. 

व्हिडीओ शेअर करताना पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "सडलेले अंडे फोडण्यापूर्वी ते शोधा! बचावासाठी टॉर्च पद्धत. या उन्हाळ्यात, उष्णतेमुळे अंडी खराब होणं सामान्य आहे. वर दाखवल्याप्रमाणे अंडे वापरण्यापूर्वी नेहमीच त्याची चाचणी घ्या आणि जास्त काळ टिकण्यासाठी ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा."

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर 10 लाखांहून अधिक व्ह्यूजसह व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये ही उपयुक्त ट्रीक सांगितल्याबद्दल कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं आहे की, "चांगली आयडिया, शेअर केल्याबद्दल धन्यवाद." दुसऱ्याने लिहिलं आहे की, "खूप आवश्यक माहिती, धन्यवाद."

काही युजर्सनी अंड्यांचा दर्जा तपासण्यासाठी स्वतःच्या टिप्स आणि युक्त्या शेअर केल्या. एकाने सांगितलं की, "माझी आई ती एका वेगळ्या लहान भांड्यात फोडते आणि नंतर ते उर्वरित अंड्यांमध्ये मिसळते."

एकाने सांगितलं की, "चांगली टीप आहे पण आणखी एक टीप आहे: अंडी पाण्याच्या भांड्यात बुडवा, जर अंडी बुडली तर ती चांगली आहे; जर ती तरंगली तर ती खराब झाली आहेत".

Read More