How to remove tough stains from a wash basin: घरात रोजच्या वापरात वॉश बेसिनचा बऱ्यापैकी जास्त वापर होतो. घरात बाथरूम आणि टॉयलेटसोबतच वॉश बेसिनही साफ ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण तिथूनही आजार पसरू शकतात. सततच्या वापरामुळे पाण्याचे डाग, साबणाचे थर आणि बॅक्टेरिया साचतात. याला साफ करण्यासाठी बाजारात अनेक महागडे क्लिनर आहेत. पण त्यामध्ये पैसे घालवण्याऐवजी तुम्ही स्वस्त घरगुती पर्याय वापरू शकता. एक सोप्पं उपाय म्हणजे कैरीच्या सालीचा वापर करून वॉश बेसिन साफ करणे.
काय सामान लागेल?
- सुकवलेले कैरीची साल
- थोडं मीठ
- पांढरं टूथपेस्ट (साधं, जेल नसलेलं)
कशी करायची तयारी?
- कच्च्या कैरीचं पन्हं, लोणचं किंवा चटणी करताना काढलेली कैरीची सालं फेकून न देता स्टोअर करून ठेवा.
- ही सालं एक दिवस उन्हात चांगली सुकवून घ्या. तुमच्याकडे ऊन येत नसेल, तर ओव्हनमध्ये 2 मिनिटं गरम करूनही सुकवू शकता.
- आता ही सुकलेली सालं मिक्सरमध्ये बारीक वाटून पावडर तयार करा.
- त्या पावडरमध्ये २ चमचे मीठ मिसळा आणि एका डब्यात भरून ठेवा. तुमचं सालीपासून बनवलेलं नैसर्गिक क्लीनिंग पावडर तयार आहे.
कशी वापरायची ही पावडर?
- एका छोट्या वाटीत तयार केलेली ही पावडर घ्या.
- त्यात 1 चमचा पांढरं टूथपेस्ट टाका.
- दोन्ही गोष्टी छान मिक्स करून घ्या.
- आता ही पेस्ट ब्रशच्या मदतीने वॉश बेसिनवर चोळा.
- 5 ते 10 मिनिटं तसेच ठेवून द्या.
- नंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
- फक्त चमकच नाही तर मिळतात फायदेही
- या नॅचरल क्लिनरमुळे वॉश बेसिनवरचे पक्के डाग, बॅक्टेरिया आणि घाणेरडा वास निघून जातो.
- कोणताही केमिकल क्लिनर वापरण्याची गरज नाही.
- कैरीचे साल वापरून फुकटात स्वच्छता करता येते. क्लिनरसाठी वेगळे पैसे द्यायची गरज नाही.