Marathi News> Lifestyle
Advertisement

टाकीतलं पाणी कधीच होणार नाही खराब, फक्त 1 लाडकाचा तुकडा टाका सर्व किडे मरतील

पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे हे अवघड काम आहे. तेव्हा तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहोत ज्याचा वापर केल्याने टाकीतलं पाणी नेहमी स्वच्छ राहण्यास मदत होईल. 

टाकीतलं पाणी कधीच होणार नाही खराब, फक्त 1 लाडकाचा तुकडा टाका सर्व किडे मरतील

Water Tank Cleaning : सध्या अनेक घरांमध्ये पाणी साठवण्यासाठी पाण्याच्या टाकीचा वापर केला जातो. बाथरूम, किचन, बेसिंक इत्यादी सर्व ठिकाणी टाकीतूनच पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु बऱ्याचदा या टाकीतील पाणी खराब होते आणि असे पाणी वापरल्यास इंफेक्शन होऊ शकतं. तसेच पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे हे अवघड काम आहे, यामुळे महिनोंमहिने या टाक्या साफ केल्या जात नाहीत. स्वच्छता न ठेवल्याने यांमध्ये धूळ, घाण साचते. तेव्हा तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या वापराने टाकीतलं पाणी नेहमी स्वच्छ राहण्यास मदत होईल. 

टाकीच पाणी खराब होण्यापासून वाचवण्याचे उपाय : 

काहीवेळा टाकीच झाकण हे खुलं राहतं. यामुळे पाण्यात धूळ - माती, कीटक त्याच्यात पडतात. यामुळे पाणी खराब होते. रेग्युलर टाकी आतून बाहेरून स्वच्छ न केल्याने  त्याच्या तळाला घाण जमा होते. जर टाकीतील घाण पाणी अंघोळ करताना तोंडात गेले तर तुम्ही आजारी पडू शकता. डायरिया, पोटदुखी अशा समस्या होऊ शकतात. 

1. टाकीतील पाणी दूषित होऊ नये किंवा त्यात कीटक आणि बॅक्टेरियाची वाढ होऊ नये म्हणून तुम्ही त्यात जांभळाच्या झाडाचे लाकूड टाकू शकता. यामुळे पाणी पूर्णपणे स्वच्छ राहील. जांभळाचे लाकूड पाण्यात टाकल्यास वर्षानुवर्षे ते खराब होत नाही असे म्हंटले जाते. 

हेही वाचा : शॉपिंग करण्यापूर्वी कॉफी पिताय? मग खिसा रिकामा झालाच म्हणून समजा, काय आहे नेमकं प्रकरण?

 

जांभळाचे लाकूड हे फायटोकेमिकल्स सोडते. या रसायनामुळे पाण्यात वाढणाऱ्या कीटकांचा नाश होतो. हे रसायन पोटात गेल्यास खूप फायदा होता. तसेच अनेक प्रकारच्या रोगांशी लढण्यास मदत होऊ शकते. 

2.  पूर्वीच्या काळी आरओ वॉटर फिल्टर नसायचे त्यावेळी लोक मटक्यांमध्ये जांभळाचे लाकडाचा तुकडा टाकायचे. पूर्वीचे लोक खूप वर्ष जगायचे. 

3.  जांभळाचे लाकूड आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे फुफ्फुस, हाडे आणि हृदय निरोगी राहतात तर रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. 

About the Author

Pooja Pawar 

... Read more
Read More