How to Make Mumbai Masala Sandwich: मुंबई शहराची ओळख ही फक्त स्वप्नांचं शहर म्हणून होत नाही तर इथल्या अप्रतिम स्ट्रीट फूडसाठीही मुंबई प्रसिद्ध आहे. मुम्बातील अनके पदार्थ अगदी जभरात प्रसिद्ध आहेत. अशाच स्ट्रीट फूडपैकी एक लोकप्रिय आणि चवदार पदार्थ म्हणजे मुंबई मसाला सॅंडविच. गरमागरम बटाट्याचा मसाला, टोमॅटो, कांदा, काकडी यांचे थर, हिरवी चटणी आणि बटरमध्ये शेकवलेला कुरकुरीत ब्रेड... हे सगळं मिळून बनते एक मुंबई मसाला सॅंडविच. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चहा सोबत, हे मुंबई मसाला सॅंडविच उत्तम लागते. चला तर मग, बनवूया घरच्या घरी अस्सल मुंबई स्टाइल मसाला सॅंडविच!
ब्रेड स्लाइस – ८ (पाव किंवा ब्राउन ब्रेड)
बटर – आवश्यकतेनुसार
हिरवी चटणी – ४ टेबलस्पून
उकडलेले बटाटे – ३ मध्यम (गोल चकत्या /मॅश केलेले)
कांदा – १ मध्यम (पातळ चिरलेला)
टोमॅटो – १ मध्यम (पातळ चिरलेला)
काकडी – १ मध्यम (पातळ चिरलेली)
चाट मसाला – १ टीस्पून
काळे मीठ – ½ टीस्पून
चीज (ऐच्छिक) – किसलेले (२ टेबलस्पून)
शेव – सजावटीसाठी
तेल – १ टेबलस्पून
मोहरी – ½ टीस्पून
हळद – ¼ टीस्पून
आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
हिरवी मिरची – १ (चिरलेली)
मीठ – चवीनुसार
उकडलेला बटाटा – ३ (मॅश केलेला)
कोथिंबीर – थोडीशी (चिरलेली)
कोथिंबीर – ½ कप
पुदिना – ¼ कप
हिरव्या मिरच्या – २
लसूण पाकळ्या – २
लिंबाचा रस – १ टीस्पून
मीठ – चवीनुसार
पाणी – थोडंसं
कढईत तेल गरम करा.
त्यात मोहरी घाला. तडतडल्यावर हळद, आले-लसूण पेस्ट आणि मिरची घालून परतवा.
नंतर त्यात मॅश केलेला बटाटा आणि मीठ घालून सगळं नीट मिसळा.
शेवटी कोथिंबीर टाकून गॅस बंद करा. मसाला थंड होऊ द्या.
प्रत्येक ब्रेड स्लाइसवर आधी बटर लावा, मग हिरवी चटणी लावा.
त्यावर बटाटा मसाल्याचा थर लावा.
त्यावर टोमॅटो, कांदा आणि काकडीचे स्लाइस ठेवा.
थोडासा चाट मसाला आणि काळं मीठ पसरवा.
इच्छेनुसार किसलेला चीज घाला.
दुसरी ब्रेड स्लाइस वर ठेवून सॅंडविच बंद करा.
आता हे सॅंडविच टोस्टर किंवा ग्रिलरमध्ये कुरकुरीत होईपर्यंत ग्रिल करा. टोस्टर नसेल, तर तव्यावर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत भाजा.
सॅंडविच तुकडे करून गरमागरम हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉससोबत द्या.
वरून थोडी शेव घालायला विसरू नकात.