Marathi News> Lifestyle
Advertisement

Butter Tea recipe: 'हा' बटर टी तुम्हाला थंडीत देईल वेगळीच एनर्जी, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

Homemade Butter Tea : चहा सगळ्यांनाच आवडतो, पण तुम्ही कधी बटर चहा चाखला आहे का? नसेल तर या चहाची अनोखी चव तुम्ही अजून घेतली नसेल तयार आम्ही सोपी रेसिपी शेअर करत आहोत. 

Butter Tea recipe: 'हा' बटर टी तुम्हाला थंडीत देईल वेगळीच एनर्जी, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

How to make Butter Tea: अगदी प्रत्येक भारतीय घरात चहा बनवला जातो. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही. चहाचे विविध प्रकार आहेत.  पण तुम्ही कधी बटर चहा चाखला आहे का? आले, गुलाब किंवा गूळ असलेला चहा बाजारात सर्रास मिळतो, पण तुम्हाला बटर टी माहित आहे का? या चहाची अनोखी चव तुमला नवीन अनुभव देईल. हा चहा बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि त्याची चव इतकी अप्रतिम आहे की एक कप प्यायल्यानंतर तुम्हाला आणखी मागायला भाग पडेल. चला बटर चहा बवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.

4 लोकांसाठी चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

4 कप पाणी
2 चमचे चहाची पाने
1/4 टीस्पून मीठ
2 चमचे बटर 
1/3 कप फुल फॅट दूध

हे ही वाचा: दुधाच्या चहा ऐवजी दिवसाची सुरुवात करा 'हे' आरोग्यदायी चहा पिऊन

जाणून घ्या रेसिपी 

बटर टी किंवा बटर चहा बनवण्यासाठी सर्वातप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी उकळून घ्या.
आता उकळत्या पाण्यात चहाची पाने अर्थात चहापत्ती घाला आणि सुमारे 5 मिनिटे उकळू द्या.
यानंतर गाळणीच्या साहाय्याने चहा गाळून घ्या.
नंतर गाळलेल्या चहामध्ये मीठ आणि दूध घाला.

हे ही वाचा: Chicken Soup Recipe: हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवेल हे चिकन सूप, फक्त बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

आता हे मिश्रण रवीच्या मदतीने किंवा ब्लेंडरमध्ये चहाचा पोत क्रीमी होईपर्यंत फिरवून घ्या. 
शेवटी, त्यात बटर घाला आणि पुन्हा चांगले फिरवा. 
अशाप्रकारे तुमचा बटर टी तयार आहे. 
हिवाळ्यात तुम्ही कधीही याचा आनंद घेऊ शकता.

Read More