World Avocado Day: आजच्या फास्ट लाईफमध्ये अॅव्होकाडो हे केवळ हेल्दीच नाही तर ट्रेंडीही बनलं आहे. टोस्टवर स्मॅश केलेलं असो,किंवा चीज आणि ब्रिओश बरोबर सॉलीड कॉम्बिनेशन असो अॅव्होकाडो प्रत्येक रूपात लोकप्रिय ठरत आहे. आज ३१ जुलै रोजी जगभरात अॅव्होकाडो डे साजरा केला जातो. याच निमित्ताने इम्प्रेसारियो एंटरटेनमेंट अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह शेफ शेफ शमसुल वाहिद यांच्याकडून एक खास रेसिपी जाणून घेऊयात.
ब्रिओश ब्रेड (साधा ब्रेड घेतला तरी चालेल ) – १२० ग्रॅम
मेयोनीज – २० ग्रॅम
अॅव्होकाडो – ४० ग्रॅम
अंडी – ३
ग्राना पडानो चीज – ५ ग्रॅम
केवपी मेयोनीज – १० ग्रॅम
बटर – ४५ ग्रॅम
मीठ – ३ ग्रॅम
क्रीम चीज – १० ग्रॅम
फ्रेश क्रीम – १० ग्रॅम
चॉप केलेलं चिव्ह्स – २ ग्रॅम
तीळाचं तेल – ५ मि.ली.
श्रीराचा सॉस – १० ग्रॅम
एका लहान बाऊलमध्ये मेयोनीज, श्रीराचा आणि तीळाचं तेल एकत्र मिसळा. व्यवस्थित फेटून घ्या आणि थंड ठेवून द्या.
१. अंडी एका बोलमध्ये फोडून फेटून घ्या.
२. पॅनमध्ये एक टेबलस्पून बटर गरम करा.
३. त्यात अंडी ओता आणि मंद आचेवर हलक्या हाताने ढवळा.
४. थोडं सेट होऊ लागल्यावर त्यात क्रीम चीज आणि ग्रेट केलेलं ग्राना पडानो चीज घाला.
५. अंडी सॉफ्ट आणि थोडीशी रनी असताना गॅस बंद करा.
१. ब्रिओशच्या जाडसर स्लाइसेस (सुमारे १.५ इंच) कापा.
२. प्रत्येक स्लाइसच्या मध्यभागी खाच करा, पण पूर्ण न कापता सॅंडविच पॉकेट करा.
३. तळणीत उरलेलं बटर गरम करा आणि ब्रिओश सर्व बाजूंनी सोनेरी होईपर्यंत टोस्ट करा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊसूत असायला हवं.
अॅव्होकाडो सोलून, बी काढून, समप्रमाणात स्लाइस करा आणि फ्रिजमध्ये ठेवून थंड ठेवा.
टोस्टेड ब्रिओशचा स्लाइस घ्या .
आत एक लेयर ‘बॉस मेयो’ पसरवा.
त्यावर क्रीमी स्क्रॅम्बल्ड अंड ठेवा.
अॅव्होकाडोचे स्लाइस व्यवस्थित रचून लावा.
वरून थोडंसं केवपी मेयो ड्रिझल करा.
चिव्ह्स आणि थोडं तीळ पेरा.
गरम गरम सर्व्ह करा.
भारतातील आवडतं नेबरहूड कॅफे-बार, SOCIAL आता 'वर्ल्ड अॅव्होकाडो डे'च्या निमित्ताने स्वादिष्ट आणि हटके अॅव्होकाडो डिशेससह खास सेलिब्रेशनसाठी करत आहे. ‘स्मॅश’ पासून ते ‘क्विर्की ट्विस्ट’ पर्यंत असे अॅव्होकाडोचे अनेक प्रकार एकाच ठिकाणी तुम्हाला टेस्ट करता येईल.