Marathi News> Lifestyle
Advertisement

नाश्त्यासाठी बनवा दही-पोहे, उन्हाळ्यात पोटाला देईल थंडावा, जाणून घ्या सोपी Breakfast Recipe

Dahi Pohe Recipe in Marathi: दही-पोहे बनवायला जास्त सामान लागत नाही याशिवाय जास्त वेळही लागत नाही.   

नाश्त्यासाठी बनवा दही-पोहे, उन्हाळ्यात पोटाला देईल थंडावा, जाणून घ्या सोपी Breakfast Recipe

How to Make Dahi Poha Healthy Breakfast Recipe: उन्हाळा कमी होत नाहीये. अवेळी येणारा पाऊस गर्मी जास्त वाढवत आहे. अशावेळी चांगला नाश्ता करणे गरजेचे आहे. नाही तर दिवसभर लागणारी ऊर्जा मिळणार नाही आणि पोटही शांत नसेल. उन्हाळ्यात हलका, थंडावा देणारा आणि पचायला सोपा नाश्ता खाणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अशा वेळी पारंपरिक आणि हेल्दी रेसिपी कामी येतात. यातलाच एक पर्याय म्हणजे दही-पोहे. हा नाश्ता फक्त १०-१५ मिनिटांत तयार होतो, चविष्ट लागतो आणि शरीरात गारवा निर्माण करतो. चला आज जाणून घेऊयात दही-पोह्यांची सोपी आणि पौष्टिक रेसिपी जी उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट आहे.

किती वेळ लागेल? 

दोन व्यक्तींसाठी दही पोहे बनवण्यासाठी 10-15 मिनिटे वेळ लागेल. 

हे ही वाचा: Recipe: नाश्त्यासाठी बनवा रवा-पोह्यांची सॉफ्ट आणि हेल्दी इडली, झटपट तयार होईल Healthy Breakfast

 

लागणारे साहित्य

  • पातळ पोहे – 1 कप
  • दही (थंड व गाळून घेतलेले) – 1 कप
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  • हिरवी मिरची – 2 (बारीक चिरलेली)
  • जिरे – 1/2 टीस्पून
  • मोहरी – 1/2 टीस्पून
  • हिंग – चिमूटभर
  • कढीपत्ता – 5-6 पाने
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – 1/2 टीस्पून (ऐच्छिक)
  • शेंगदाणे – 2 टेबलस्पून
  • तेल – 1 टेबलस्पून

हे ही वाचा: घरच्या घरी बनाव ढाबा स्टाईल अमृतसरी पिंडी छोले, जाणून घ्या शाही भाजीची सोपी Recipe

 

कसे बनवायचे दही-पोहे? 

  • सर्वात आधी पोहे धुवून घ्या. 
  • पातळ पोहे 2-3 वेळा पाण्याने हलक्या हाताने धुवून निथळून ठेवा.
  • आता दही तयार करा. 
  • यासाठी दही थोडं फेटून घ्या. त्यात थोडंसं पाणी घालून ते गुळगुळीत करा.
  • त्यात चवीनुसार मीठ आणि ऐच्छिक असल्यास थोडीशी साखर घाला.
  • आता फोडणी तयार करून घ्या. 
  • एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता टाका.
  • नंतर त्यात शेंगदाणे व चिरलेली मिरची घालून थोडं परतवा.
  • सर्व मिश्रण छान एकत्र करून घ्या. 
  • फोडणी थोडी गार झाली की, ती दहीत घाला.
  • आता त्यात निथळलेले पोहे घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  • वरून कोथिंबीर घालून गार्निश करा आणि गार गार सर्व्ह करा.

हे ही वाचा: भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी देईल तोंडाला चव, जाणून घ्या झटपट तयार होणारी मसालेदार Recipe

 

'या' टिप्स आवर्जून लक्षात घ्या 

  • दही पोहे जास्त थंड हवे असल्यास थोडं बर्फसुद्धा घालू शकता.
  • यामध्ये थोडं किसलेलं गाजर किंवा काकडी घालून पोषणमूल्य वाढवता येते.

हा नाश्ता उन्हाळ्यात अत्यंत फायदेशीर आहे. दही-पोहे  पचायला हलके असून शरीरात थंडावा निर्माण करतात. 

Read More