Marathi News> Lifestyle
Advertisement

घरीच बनवा परफेक्ट ढाबा स्टाईल पंजाबी डाळ तडका! जाणून घ्या सोपी Recipe

Punjabi Dal Tadka Recipe in Marathi: पंजाबी स्टाईल डाळ तडका तुम्ही धाब्यावर खाल्ली असेल. हीच डाळ तुम्ही घरी सहज बनवू शकता. हा एक अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.   

घरीच बनवा परफेक्ट ढाबा स्टाईल पंजाबी डाळ तडका! जाणून घ्या सोपी Recipe

How to make Perfect Punjabi Dal Tadka Recipe in Marathi: पंजाबी खाद्यसंस्कृतीत डाळ तडका हा एक अविभाज्य भाग आहे. उत्तर भारतातील प्रत्येक घरात किंवा ढाब्यांमध्ये मिळणारी ही खास डाळ आपल्या झणझणीत तडका आणि बटरच्या स्वादामुळे सर्वांची लाडकी आहे. साध्या डाळेला तुपाचा तडका दिल्यावर तिचा स्वाद दुप्पट होतो. आपल्या घरातही वरण आवर्जून बनलं जात. पण रोज रोज तेच तेच चवीचं वरण खाऊन कंटाळा येतो. अशावेळी वेगळ्या चवीचा शोध घेतला जातो. अशावेळी ढाबा स्टाईल पंजाबी डाळ तडक बनवू शकता. तूर डाळ, मूग डाळ यांचा वापर करून बनवलेली ही पंजाबी डाळ तडका भात, रोटी, नान किंवा पराठ्यांसोबत खाण्यास अत्यंत स्वादिष्ट लागते. घरच्या घरी हॉटेल किंवा ढाब्याच्या चवीनं डाळ तडका बनवायचा असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. पंजाबी डाळ तडका ही उत्तर भारतातील एक अतिशय लोकप्रिय आणि चविष्ट रेसिपी आहे. घरच्या घरी हॉटेलसारखी पंजाबी डाळ तडका बनवण्यासाठी ही खास रेसिपी ट्राय करून बघा. 

लागणारे साहित्य

तूर डाळ – ½ कप

मूग डाळ – ¼ कप

पाणी – 2 कप (डाळ शिजवण्यासाठी)

हळद – ¼ टीस्पून

मीठ – चवीनुसार

तडका बनवण्यासाठी 

तूप / बटर – 2 टेबलस्पून

तेल – 1 टेबलस्पून

जिरं – 1 टीस्पून

सुकी लाल मिरची – 2

हिंग – 1 चिमूट

लसूण – 5-6 पाकळ्या (बारीक चिरून)

आले – 1 टीस्पून (बारीक चिरून)

कांदा – 1 मध्यम (बारीक चिरून)

टोमॅटो – 1 मोठा (बारीक चिरून)

लाल तिखट – 1 टीस्पून

गरम मसाला – ½ टीस्पून

आमचूर पावडर / लिंबाचा रस – 1 टीस्पून

कोथिंबीर – सजावटीसाठी

जाणून घ्या कृती 

तूर डाळ आणि मूग डाळ एकत्र धुऊन 15-20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.

प्रेशर कुकरमध्ये डाळ, हळद, मीठ व 2 कप पाणी घालून 3-4 शिट्ट्या काढा.

डाळ छान मऊ झाली पाहिजे. डाळ थोडी फेटून घ्या.

कढईत तूप व तेल गरम करा.

त्यात जिरं, हिंग आणि सुकं लाल मिरचं टाका.

लसूण आणि आले घालून छान परतवा.

कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतवा.

टोमॅटो घालून नरम होईपर्यंत परतवा.

त्यात लाल तिखट, गरम मसाला आणि आमचूर पावडर घाला.

चवीनुसार मीठ घालून चांगले मिसळा.

शिजवलेली डाळ या तडकामध्ये घाला.

गरज असल्यास थोडं पाणी घालून हवं तेवढा पातळ किंवा घट्ट हवं ते ठरवा.

3-4 मिनिटे उकळू द्या.

एक छोट्या पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप गरम करून त्यात थोडंसं जिरं, हिंग, लाल तिखट टाका आणि हे गरम तूप डाळेवर ओता.

वरून कोथिंबीर टाका.

भात, नान किंवा तंदुरी रोटी, चपाती  सोबत सर्व्ह करा.

टीप 

तूप किंवा बटर वापरल्याने डाळ तडका हॉटेलसारखा लागतो.

आमचूर नसल्यास लिंबाचा रस वापरू शकता.

लसूणाची फोडणी डाळ तडक्याला खास चव देते.

Read More