Marathi News> Lifestyle
Advertisement

नाश्त्याला नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? बनवा फ्युजन स्टाईल चीज मसाला घावन, नोट करा Recipe

Cheese Masala Ghavan Recipe: चीज मसाला घावन हे पारंपरिक चव आणि आधुनिक फोडणी यांचा भन्नाट संगम असललेली नाश्त्याची डिश आहे.   

नाश्त्याला नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? बनवा फ्युजन स्टाईल चीज मसाला घावन, नोट करा Recipe

How to Make Cheese Masala Ghavan: सकाळचा नाश्ता म्हणजे दिवसभराच्या ऊर्जेची खाण असते. पण नाश्त्यासाठी रोजचे पोहे, उपमा, पराठे तर नेहमीच बनतात. पण तेच तेच खाऊन कंटाळा येतो. सकाळी काही तरी नवीन खावंसं वाटतं. याचसाठी  आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन, हटके आणि फ्युजन स्टाईल नाश्ता. तुम्ही नाश्त्यासाठी  चीज मसाला घाव बनवू शकता. याची चव सगळ्यांचं आवडेल. चीज मसाला घावन हे पारंपरिक चव आणि आधुनिक फोडणी यांचा भन्नाट संगम असललेली नाश्त्याची डिश आहे. चला तर मग, वेळ न घालवता जाणून घेऊयात कशी बनवायची ही नाश्त्याची रेसिपी... 
 
चीज मसाला घावनासाठी लागणारे साहित्य (2-3 जणांसाठी)

  • तांदळाचं पीठ – 1 कप
  • बारीक चिरलेला कांदा – 1
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून
  • हिरव्या मिरच्या – 1-2 (चिरलेल्या)
  • मीठ – चवीनुसार
  • हळद – 1/4 चमचा
  • पाणी – सैलसर मिश्रणासाठी
  • चीज – 1/2 कप (किसलेलं)
  • तेल – थोडंसं शेकण्यासाठी

हे ही वाचा: Recipe: नाश्त्यासाठी बनवा रवा-पोह्यांची सॉफ्ट आणि हेल्दी इडली, झटपट तयार होईल Healthy Breakfast

 

कस बनवायचं चीज मसाला घावन? 

  • एका भांड्यात तांदळाचं पीठ, कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, हळद आणि पाणी घालून सैलसर घावनसाठी पीठ बनवा.
  • गरम तव्यावर थोडंसं तेल टाकून गरम होऊ द्यात आणि नंतर छान गोलाकार घावन पसरा.
  • वर किसलेलं चीज टाका आणि झाकण ठेवा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा.
  • चीज मेल्ट झालं की घावन तयार आहे. 

हे ही वाचा: संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी बनवा बटाटा मका भजी, जाणून घ्या सोपी आणि झटपट होणारी Tea Time Recipe

 

'असं' करा सर्व्ह 

गरमागरम चीज मसाला घावन, सोबत तुम्ही लोणचं, चटणी किंवा टोमॅटो सॉस देऊ सर्व्ह करू शकता. अशाप्रकारे तुमचा मस्त हटके आणि घरगुती फ्युजन ब्रेकफास्ट तयार आहे. 

Read More