Marathi News> Lifestyle
Advertisement

Ginger Halwa Recipe: सर्दी-खोकल्यापासून आराम हवाय? बनवा अद्रकाचा शिरा, प्रतिकारशक्तीही वाढेल!

Ginger Halwa Benefits:  सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अद्रकाचा शिरा फार उपयुक्त ठरेल. चला शिऱ्याची रेसिपी जाणून घेऊयात. 

Ginger Halwa Recipe: सर्दी-खोकल्यापासून आराम हवाय? बनवा अद्रकाचा शिरा, प्रतिकारशक्तीही वाढेल!

How to Make Ginger Halwa: हिवाळा येताच वेगवेगळे आजार सुरु होतात. या दरम्यान आपली प्रतिकारशक्तीही कमी होती. यामुळेच हिवाळ्याच्या सिजनमध्ये गरम अन्न पदार्थ खाणे चांगले असते.  आज आम्ही तुम्हाला एका अशा मसाल्याबद्दल सांगणार आहोत, जो चवीला उत्तम आहेच पण हिवाळ्यात तुमच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतो. हा मसाला आहे अद्रक, होय अद्रकामधे  अनेक औषधी गुणधर्म आहेत जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात, सर्दी-खोकल्यापासून आराम देतात आणि पचनक्रिया व्यवस्थित ठेवतात. यामुळेच आम्ही घेऊन आलोय अद्रकाच्या शिऱ्याची रेसिपी. 

लागणारे साहित्य 

500 ग्रॅम आले
1 कप दूध
1 कप साखर
1/2 कप देशी तूप
1/4 कप काजू
1/4 कप बदाम

हे ही वाचा: हिवाळ्यात आवर्जून खा शेंगदाणा-गुळाची चिक्की, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या


1/4 कप मनुका
1 चिमूट वेलची पावडर
1 चिमूट केशर

हे ही वाचा: Tomato Chutney Recipe: टोमॅटोची चटणी जेवणाची चव करेल दुप्पट, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

 

जाणून घ्या रेसिपी


सगळ्यात आधी आले सोलून, धुवा आणि त्याचे जाड तुकडे करा.
आता कढईत देशी तूप गरम करून त्यात तुकडे केले आले घाला आणि छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
आता भाजलेल्या आल्यामध्ये दूध घालून मध्यम आचेवर शिजवा. लक्षात घ्या हे मिश्रण अधूनमधून ढवळत राहा म्हणजे दूध तळाला चिकटणार नाही.
नंतर दूध अर्ध्यावर आल्यावर साखर घालून मिक्स करा.

हे ही वाचा: Suji Mendu Vada Recipe: घरी बनवा झटपट मेदू वडा, रविवारचा नाश्ता होईल खास; जाणून रेसिपी


आता हे मिश्रण दूध पूर्णपणे कोरडे होईपर्यंत आणि आले मऊ होईपर्यंत शिजवा.
आता त्यात काजू, बदाम आणि बेदाणे घालून चांगले मिक्स करा.
शेवटी वेलची पावडर आणि केशर घालून मिक्स करा.
एका प्लेटमध्ये हलवा काढून गरमागरम सर्व्ह करा. 

Read More