How to Make Gujarati Khichdi Recipe in Marathi: गुजराती खिचडी ही एक पारंपरिक, हलकी व पचनास सोपी अशी डाळ-तांदळाची डिश आहे. ही खिचडी प्रामुख्याने गुजराती घरांमध्ये रोजच्या जेवणाचा भाग असते. थोडी कोरडी, कमी मसालेदार, पण तुपासोबत खाल्ल्यास अगदी चविष्ट लागते. ज्या दिवशी थोडं हलकं खायचं वाटतं, किंवा पचनाचा त्रास होत असेल, त्या दिवशी ही खिचडी उत्तम पर्याय ठरते. दही, लोणचं आणि पापडासोबत ही खिचडी खास गुजराती पद्धतीने सर्व्ह केली जाते. ही खिचडी हलकी, पचायला सोपी आणि पौष्टिक असते. मसाल्यांच्या बॅलेन्स चवेमुळे ही खिचडी ओळखली जाते. चला जाणून घेऊयात रेसिपी..
बासमती किंवा खाण्याचा तांदूळ – 1 कप
मूग डाळ (साल काढलेली पिवळी) – 1/2 कप
हिंग – 1/4 टीस्पून
हळद – 1/2 टीस्पून
मीठ – चवीनुसार
साजूक तूप – 1 ते 2 टेबलस्पून
जिरे – 1 टीस्पून
आलं – 1 टीस्पून (किसलेलं किंवा पेस्ट)
हिरव्या मिरच्या – 1-2 (छोट्या तुकड्यांत कापलेल्या)
पाणी – अंदाजे 3 कप
तांदूळ आणि मूगडाळ एकत्र करून 2-3 वेळा स्वच्छ धुऊन घ्या आणि 15-20 मिनिटं भिजत ठेवा.
कढईत किंवा प्रेशर कुकरमध्ये साजूक तूप गरम करा. त्यात जिरे, हिंग, आलं आणि हिरव्या मिरच्या घालून थोडं परतून घ्या.
नंतर त्यात भिजवलेले तांदूळ आणि डाळ घालून 1-2 मिनिटं परता.
हळद, मीठ आणि 3 कप पाणी घालून एकत्र करा. झाकण लावून प्रेशर कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
शिजल्यानंतर गरमागरम खिचडी साजूक तुपासोबत किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.
ही खिचडी साखर न घातलेली आहे, पण काही गुजराती लोक थोडा गोडसरपणा देण्यासाठी साखर घालतात.
या खिचडीसोबत सोबत पापड, लोणचं, आणि ताक दिलं तर पूर्ण जेवण तयार होतं.