How to Make Himachali Dahi Chole With Phulka: हिमाचल प्रदेशातील खाद्यसंस्कृतीत साधेपणा, पौष्टिकता आणि घरगुती चव यांचा सुरेख संगम आढळतो. त्यातलाच एक लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ म्हणजे हिमाचली दही छोले. मसालेदार आणि दह्याच्या चवीसह बनवलेले हे छोले अतिशय चविष्ट लागतात. यासोबत गरमागरम फुलके दिले की छान परिपूर्ण डीश तयार होते. ही डीश घरगुती, हलकी आणि पचायला सोपी आहे. कुठल्याही वेळच्या जेवणासाठी योग्य असलेली ही रेसिपी खास हिमाचली टेस्ट महाराष्ट्रातच देणारी आहे. यामुळे ही रेसिपी एकदा तरी नक्कीच करून पाहावी अशीच आहे. चला तर मग जाणून घेऊयात रेसिपी...
काबुली चणे (छोले) – 1 कप (रात्री भिजवलेले)
दही – 1 कप (फेटलेलं)
कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
टोमॅटो – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
आलं-लसूण पेस्ट – 1 चमचा
हिंग – 1 चिमूट
जिरे – 1/2 चमचा
धणे पूड – 1 चमचा
लाल तिखट – 1/2 चमचा
गरम मसाला – 1/2 चमचा
हळद – 1/4 चमचा
मीठ – चवीनुसार
तेल – 2 टेबलस्पून
कोथिंबीर – सजावटीसाठी
हे ही वाचा: दिवसाची सुरुवात करा हेल्दी, नाश्त्यासाठी बनवा झटपट रवा इडली; नोट करा Recipe
भिजवलेले छोले कुकरमध्ये 4-5 शिट्ट्यांपर्यंत शिजवून घ्या.
कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, हिंग घाला. नंतर आलं-लसूण पेस्ट टाका व परतून घ्या.
त्यात चिरलेला कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत परता. नंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परता.
त्यात हळद, तिखट, धणे पूड, मीठ आणि गरम मसाला घालून चांगले मिक्स करा.
हे ही वाचा: विकेंडला बनाव फ्राईड राईस! झटपट आणि पोटभरीची आहे Recipe
गॅस मंद करून फेटलेलं दही हळूहळू घालून सतत हलवत शिजवा, म्हणजे ते फाटणार नाही.
शिजवलेले छोले घालून 10-15 मिनिटे मंद आचेवर उकळा. थोडं पाणी लागल्यास घाला.
कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
गव्हाचे पीठ – २ कप
पाणी – भिजवण्यासाठी
मीठ – चवीनुसार
थोडंसं तेल (मळण्यासाठी)
हे ही वाचा: जेवायला काही हलकं खायचं आहे? बनवा गुजराती डाळ-भात, जाणून घ्या Recipe
पीठात मीठ आणि थोडंसं तेल टाकून मळा. गरजेनुसार पाणी घालून मऊसर पीठ भिजवा.
किमान 15 मिनिटे झाकून ठेवा.
छोटे गोळे करून लाटून फुलके बनवा.
गरम तव्यावर भाजून वरती थेट गॅसवर फुलवा.
दही छोले गरमागरम फुलक्यांसोबत सर्व्ह करा.
वरून बारीक चिरलेली कांदा किंवा लिंबू फोड द्यायला विसरू नकात.