Marathi News> Lifestyle
Advertisement

घरची बनवा गूळ आणि चिंचेची आंबट-गोड चटणी, नोट करा Recipe

Gud aur Imli Chutney Recipe: चाट सह अनेक गोष्टींमध्ये लागणारी गूळ आणि चिंचेची आंबट-गोड चटणी कशी बनवायची हे जाणून घ्या.   

घरची बनवा गूळ आणि चिंचेची आंबट-गोड चटणी, नोट करा Recipe

How to Make homemade jaggery and tamarind sweet and sour chutney: चिंच आणि गूळ यांची आंबट-गोड चव सगळ्यांनाच आवडते. ही चटणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्ट्रीट फूडसोबत खास करून वापरली जाते. भेळपुरी, पाणीपुरी, दहीवडे, समोसा किंवा कचोरी अशा अनेक चविष्ट पदार्थांमध्ये ही चटणी मुख्य भाग असते. चिंचेची आंबटसर चव आणि गूळाची गोडसर चव यांचा सुंदर मिलाफ म्हणजेच ही आंबट-गोड चटणी. घरच्या घरी सहज बनवता येणारी, टिकणारी आणि आरोग्यदृष्ट्या फायदेशीर अशी ही चटणी एकदा जरूर करून पाहा. चला रेसिपी जाणून घेऊयात. 

लागणारे साहित्य :

चिंच – १/२ कप

गूळ – ३/४ कप (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)

लाल तिखट – १ टीस्पून

जिरे पूड – १ टीस्पून

सैंधव मीठ किंवा साधं मीठ – चवीनुसार

पाणी – १ कप (चटणीच्या घट्टपणानुसार कमी-जास्त)

जाणून घ्या कृती :

आधी चिंच अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवा.

नंतर चिंच हाताने चोळून कोळ काढा आणि बिया व साल वेगळं करा.

एका भांड्यात चिंचेचा कोळ आणि गूळ मिक्स करून गॅसवर ठेवा.

गूळ पूर्ण विरघळेपर्यंत मध्यम आचेवर हलवत राहा.

त्यात लाल तिखट, जिरेपूड आणि मीठ घाला.

५-७ मिनिटं उकळून घ्या. चटणी थोडी घट्ट होईल.

गॅस बंद करून थंड होऊ द्या.

चटणी थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत साठवा.

'या' टिप्स फॉलो 

ही चटणी तुम्ही पाणीपुरी, भेळ, दहीवडे, समोसा यासोबत वापरू शकता.

फ्रीजमध्ये ठेवली तर १५-२० दिवस टिकते.

Read More