How to make Moong Dal Chilla, Dhirde: रोज उठून नाश्त्यासाठी काय करायचं हा प्रश्न पडतो. सकाळचा नाश्ता हा हेल्दी असावा असेही वाटते. याच साठी आम्ही तुमच्यासाठी एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. भरपूर प्रोटीन आणि फायबरने भरलेली ही हिरव्या मूग डाळीचे धिरडे (Instant Healthy Green Moong Dal Chilla Recipe) झटपट तयार होतात आणि दिवसभरात धावपळ करण्यासाठी लागणारी उर्जा देतात. नाष्ट्याला नेहमी तयार केल्या जाणाऱ्या पोहे, उपमा या पदार्थांना पर्याय म्हणून हे धिरडे नक्की करून पाहा. चला चवदार आणि आरोग्यदायी मूग डाळीचे धिरडे कसे बनवायचे हे जाणून घेऊयात.
हिरवी मूग डाळ – 1 कप (रात्री भिजवलेली, 6-8 तास)
हिरवी मिरची – 1-2 (तिखटपणानुसार)
आले – 1/2 इंचाचा तुकडा
जिरे – 1/2 टीस्पून
हळद – 1/4 टीस्पून
मीठ – चवीनुसार
कोथिंबीर – 2 टेबलस्पून (चिरून)
कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला, ऐच्छिक)
तेल – भाजण्यासाठी
हे ही वाचा: Recipe: नाश्त्यासाठी बनवा रवा-पोह्यांची सॉफ्ट आणि हेल्दी इडली, झटपट तयार होईल Healthy Breakfast
मूग डाळ स्वच्छ धुऊन 6-8 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा.
नंतर भिजवलेली डाळ चाळून घ्या.
मिक्सरमध्ये डाळ, हिरवी मिरची, आले, जिरे आणि थोडंसं पाणी टाकून जाडसर वाटा.
हे पीठ एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात हळद, मीठ, चिरलेली कोथिंबीर आणि हवे असल्यास कांदा टाका. हे मिश्रण चांगले मिसळा.
हे ही वाचा: नाश्त्यासाठी बनवा दही-पोहे, उन्हाळ्यात पोटाला देईल थंडावा, जाणून घ्या सोपी Breakfast Recipe
आता तवा मध्यम आचेवर गरम करा. थोडं तेल टाका आणि टिश्यूने पुसून घ्या.
तवा गरम झाल्यावर थोडं पीठ तव्यावर घाला आणि हळूवार पसरवा. अगदी डोसा करतो तसे त्याला पसरावा.
वरून थोडंसं तेल पसरवा. झाकण ठेवून 1-2 मिनिटं शिजवून घ्या.
नंतर उलटवून दुसऱ्या बाजूनेही खरपूस भाजून घ्या.
तयार गरमागरम धिरडे चटणी, दहीसोबत सर्व्ह करा.
हे ही वाचा: सकाळच्या गडबडीत स्वादिष्ट आणि झटपट नाश्ता हवा आहे? ट्राय करा रवा उपमा, नोट करा Breakfast Recipe
डाळीत थोडे पालक, किसलेले गाजर किंवा बीट घातल्यास हे धिरडे हेल्दी होईल.
हे धिरडे ग्लूटन-फ्री आणि हाय प्रोटीन आहेत त्यामुळे मंगळवारी उपास नसलेल्यांसाठी उत्तम पर्याय आहे.