Marathi News> Lifestyle
Advertisement

नाश्त्यासाठी बनवा झटपट होणारा पोहे उत्तप्पा, पूर्वतयारीची नाही गरज, जाणून घ्या Recipe

Instant Poha Uttapam Recipe: सकाळच्यावेळी झटपट होणारा साऊथ इंडियन नाष्टा हवा असेल तर झटपट होणारा पोहे उत्तप्पा बनवा.   

नाश्त्यासाठी बनवा झटपट होणारा पोहे उत्तप्पा, पूर्वतयारीची नाही गरज, जाणून घ्या Recipe

How to Make Pohe Uttapam: पोहे उत्तप्पा हा एक झटपट, पौष्टिक आणि चवदार असा नाश्ता आहे. यासाठी जास्त सामानही लागत नाही. हा उत्तपा पोहे, रवा आणि दही वापरून बनवला जातो. दक्षिण भारतीय उत्तप्प्याला महाराष्ट्रीय पोह्यांची मजा देणारी ही फ्यूजन डिश आहे.   हलकं, झटपट आणि हेल्दी नाश्ता हवा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. टिफिन किंवा हलकं जेवण म्हणून ही रेसिपी परफेक्ट आहे. चला जाणून घेऊयात सोपी रेसिपी... 

लागणारे साहित्य (Pohe Uttapam Recipe Ingredients)

जाड पोहे – 1 कप

रवा  – ½ कप

दही – ½ कप

पाणी – अंदाजे ½ कप (Consistency नुसार)

इनो / बेकिंग सोडा – ½ टीस्पून

मीठ – चवीनुसार

हे ही वाचा: World Poha Day: नाश्त्याला बनवा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अत्यंत लोकप्रिय असलेले पोहे! नोट करा Recipe

 

वरून घालण्यासाठी (Topping साठी)

बारीक चिरलेला कांदा – 1 मध्यम

बारीक चिरलेला टोमॅटो – 1 मध्यम

बारीक चिरलेली कोथिंबीर – 2 टेबलस्पून

बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1-2

किसलेले गाजर (ऐच्छिक) – 2 टेबलस्पून

मिरीपूड किंवा चाट मसाला – थोडा

हे ही वाचा: घाईच्या वेळेत झटपट नाश्ता हवा आहे? बनवा ब्रेड रोल, जाणून घ्या सोपी Breakfast Recipe

कसा बनवायचा उत्तपा?  (Steps)

पोहे स्वच्छ धुवून 5-10 मिनिटांसाठी बाजूला भिजवून ठेवा.

नंतर ते हाताने मऊ करून मिक्सिंग बाऊलमध्ये घ्या.

भिजवलेले पोहे, रवा, दही एकत्र करून मिक्स करा.

थोडं थोडं पाणी घालून भजीच्या पिठासारखी पीठ तयार करा.

मिश्रण झाकून 15-20 मिनिटांसाठी ठेवून द्या.

एका बाउलमध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, गाजर एकत्र करून टॉपिंग तयार ठेवा.

15-20 मिनिटांनंतर, इनो किंवा बेकिंग सोडा घालून मिश्रण हलक्या हाताने फुलवून घ्या.

तवा गरम करून त्यावर थोडं तेल घाला.

पीठ तव्यावर ओता आणि थोडसं गोलसर पसरवा (डोश्यासारखं पातळ नको).

त्यावर लगेच तयार केलेलं टॉपिंग पसरा आणि हलकं दाबा.

झाकण ठेवून मध्यम आचेवर 2-3 मिनिटं शिजवा.

नंतर उलटवून दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंग येईपर्यंत परत शिजवा.

गरम गरम पोहे उत्तप्पा कोथिंबीर चटणी, मिंट चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

हे ही वाचा: सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी बनवा झटपट होणार ब्रेड उपमा, नोट करा Recipe

'या' टिप्स फॉलो करा (Tips)

हवं असल्यास किसलेलं चीज सुद्धा टॉपिंगवर घालू शकता.

लहान मुलांसाठी थोडं कमी मिरची घालावी.

हवे असल्यास बारीक शिजवलेले कॉर्न किंवा शिमला मिर्ची पण टॉपिंगमध्ये घालू शकता.

Read More