Marathi News> Lifestyle
Advertisement

Recipe: नाश्त्यासाठी बनवा रवा-पोह्यांची सॉफ्ट आणि हेल्दी इडली, झटपट तयार होईल Healthy Breakfast

Rava Poha Healthy Idli Recipe: रवा आणि पोहे यांचा वापर करून बनवल्या जाणाऱ्या या इडलीच्या चवदार, झटपट व हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आहे. ही इडली फक्त अर्ध्या तासात तयार होते.   

Recipe: नाश्त्यासाठी बनवा रवा-पोह्यांची सॉफ्ट आणि हेल्दी इडली, झटपट तयार होईल Healthy Breakfast

How to Make Instant Rava Poha Healthy Idli Recipe: गृहिणींना रोज नाष्टासाठी काय बनवायचं हा प्रश्न पडलेला असतो. फक्त नाश्ता काय बनवायचं? हाच प्रश्न नाही तर हेल्दी नाश्ता काय बनवायचा?  हा प्रश्न पण असतो. नेहमीच पदार्थ नाश्त्यात खाऊन कंटाळा येतो. मुलांना तर दररोज काही तरी नवीन हवे असते. अशा परिस्थितीत तुम्ही इडली बाऊ शकता. नेहमीच्या इडलीपेक्षा झटपट तयार होणारी इडली ट्राय करता येईल. आज आम्ही तुमच्यासाठी रवा आणि पोह्यांपासून बनवली जाणारी हेल्दी इडलीची रेसिपी सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला सकाळचा जास्त वेळी द्यावा लागणार नाही. याशिवाय या इडल्या पचायला हलक्या असून दिवसभर लागणारी ऊर्जाहि देतात.चला जाणून घेऊयात साहित्य आणि कृती.... 

लागणारे  साहित्य 

  • बारीक रवा (सूजी) – 1 कप
  • जाड पोहे – 1/2 कप
  • ताक – 1 कप (आवश्यकतेनुसार)
  • इनो/सोडा – 1 टीस्पून
  • बारीक चिरलेला गाजर – 1/4 कप
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – 2 टेबलस्पून
  • हिरवी मिरची (चिरून) – 1
  • आले – 1/2 टीस्पून (किसलेले)
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – थोडंसं (इडलीच्या साच्यावर लावण्यासाठी)

'या' स्टेप्स करा फॉलो 

  • पोहे धुवून 10-15 मिनिटं भिजवून ठेवा. नंतर पोह्यांना मिक्सरमध्ये थोडसं पाणी घालून मऊ वाटून घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात रवा, वाटलेले पोहे, ताक, आले, मिरची, गाजर, कोथिंबीर आणि मीठ मिसळा.
  • हे मिश्रण झाकून 15-20 मिनिटांसाठी बाजूला झाकून ठेवा. यामुळे पीठ छान फुलून येईल. 
  • नंतर इनो टाका आणि लगेचच नीट मिसळा.
  • इडली साच्यांना तेल लावून त्यात मिश्रण घाला.
  • स्टीमरमध्ये 10-12 मिनिटं वाफवून घ्या.
  • गरमागरम इडल्या नारळाची चटणीसोबत सर्व्ह करा.

मिळतात 'हे' फायदे

  • रवा आणि पोहे हे ऊर्जा देणारे आणि पचायला हलके असतात.
  • गाजर आणि ताक यामुळे फायबर्स व प्रोबायोटिक्स मिळतात. 
  • तेल अत्यंत कमी वापरल्याने हा एक लो-कॅलोरी आणि हेल्दी नाश्ता आहे.
Read More