Marathi News> Lifestyle
Advertisement

नाश्त्याला बनवा मुगाच्या डाळीची इडली, मुलांच्या डब्यासाठीही आहे उत्तम Recipe

Moong Dal Idli Recipe in Marathi: नाश्त्यासाठी (Breakfast Recipe) काही तरी हेल्दी पर्याय बघत असाल तर आवर्जून मुगाच्या डाळीची इडली ट्राय करा. ही इडली प्रोटीनने भरलेली, पचायला हलकी आणि हेल्दी आहे. चला जाणून घ्या रेसिपी...   

नाश्त्याला बनवा मुगाच्या डाळीची इडली, मुलांच्या डब्यासाठीही आहे उत्तम Recipe

How to Make Moong Dal Idli at Home: आपण नेहमीच आरोग्यदायी आणि पचायला हलक्या नाश्त्याच्या शोधात असतो. अशा वेळी पारंपरिक इडलीला एक हेल्दी ट्विस्ट देणारी मुग डाळीची इडली हा एक उत्तम पर्याय.  ही इडली नुसतीच स्वादिष्ट नाही, तर प्रथिनांनी भरलेली, तेलकट नसलेली आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हेल्दी पर्याय ठरते. नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा हलक्या रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही ही इडली आवर्जून करून पाहा. चला तर मग, पाहूया ही झटपट व आरोग्यदायी मुगाच्या डाळीची इडली कशी बनवायची... 

मुग डाळीची इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य  (Ingredients)

मुगडाळ (साल काढलेली) – 1 कप

रवा  – 1/2 कप

दही – 1/2कप

अद्रक-हिरवी मिरची पेस्ट – 1 टेबलस्पून

इनो फ्रूट सॉल्ट – 1 टीस्पून (किंवा बेकिंग सोडा 1/4 टीस्पून)

मीठ – चवीनुसार

पाणी – आवश्यकतेनुसार

तेल – थोडंसं (इडली प्लेटला लावण्यासाठी)

हे ही वाचा: दिवसाची सुरुवात करा हेल्दी, नाश्त्यासाठी बनवा झटपट रवा इडली; नोट करा Recipe

 

कशी बनवायची इडली? जाणून घ्या कृती (Step-by-Step Instructions)

मुगडाळ स्वच्छ धुऊन 3-4 तास पाण्यात भिजवा.

भिजवलेली मुगडाळ थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटा.

त्यात रवा, दही, मीठ, आणि अद्रक-हिरवी मिरची पेस्ट घालून मिश्रण चांगलं एकत्र करा.

हे मिश्रण 15-29 मिनिटं झाकून ठेवा, म्हणजे रवा थोडा फुलेल.

इडलीच्या साच्याला थोडं तेल लावून ग्रीस करा.

हे ही वाचा: थंडगार पावसाळी वातावरणात बनवा स्वादिष्ट वरणफळ! जाणून घ्या मराठमोळी Recipe

शेवटी इनो फ्रूट सॉल्ट घाला आणि लगेचच मिश्रण इडलीच्या साच्यात ओता. (इनो टाकल्यानंतर लगेच स्टीम करावं.)

इडली कुकर/इडली स्टँडमध्ये 10-12 मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घ्या.

एका सूरीने किंवा टूथपिकने तपासा, जर सूरी किंवा टूथपिक स्वच्छ बाहेर आली तर इडली शिजली आहे.

गरम गरम मुग डाळीच्या इडल्या नारळाची चटणी किंवा सांबारासोबत सर्व्ह करा.

हे ही वाचा: जेवायला बनवा हिमाचली दही छोले आणि फुलका, विकेंड जाईल छान; जाणून घ्या Recipe

 

'या' टिप्स फॉलो करा 

तुम्हाला हवे असल्यास या इडलीमध्ये  बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेले गाजर किंवा उडद डाळीचा फोडणीचा खमंगपणा आणू शकता.

Read More