How to make Onion Chutney: जेवणाची चव अजून वाढवण्यासाठी सोबत चटणी खाल्ली जाते. भारतात तर चटणीला खूप महत्त्व आहे. अनेकांचं जेवण चटणीशिवाय पूर्ण होत नाही. अनेकदा कोथिंबीर किंवा पुदिन्याची चटणी जेवणासोबत खाण्यासाठी बनवली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की कांद्याची चटणीही तुम्ही बनवू शकता. खूप चविष्ट असते. कांद्याची चटणी एक चवदार आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. याचे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. ही चटणी जेवणाची चव तर वाढवतेच पण त्यामध्ये असलेले पोषक तत्व देखील शरीरासाठी खूप फायदेशीर असतात (Benefits of Onion Chutney). जर तुम्ही यापूर्वी कधीही कांद्याची चटणी बनवली नसेल तर तुम्ही येथे दिलेल्या रेसिपीला फॉलो करून घरी झटपट बनवू शकता. चला जाणून घेऊया कांद्याची चटणी कशी बनवली जाते आणि त्याचे फायदे काय आहेत.
हे ही वाचा: Masala Pav Recipe: काही तरी हटके खायचे आहे? बनवा मसाला पाव, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या
सर्व प्रथम, कांदा छान बारीक चिरून घ्या. जर तुम्हाला कांद्याचा तिखटपणा कमी करायचा असेल तर कापलेला कांदा 10 मिनिटे थंड पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे कांद्याचा तिखटपणा कमी होईल.
एका भांड्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, भाजलेले जिरेपूड आणि काळे मीठ घ्या.आता त्यात लिंबाचा रस घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात1 टीस्पून तेलही घालू शकता, त्यामुळे चटणी अजून चटकदार होते.
पुढे सर्व साहित्य चांगले मिसळा. लक्षात ठेवा की चटणीमध्ये मीठ आणि मसाले तुमच्या चवीनुसार असावेत.
हे ही वाचा: घरच्या घरी बनवा गूळ-शेवेचे लाडू, एकदा खाल्ल्यानंतर प्रत्येकजण करेल कौतुक; जाणून घ्या Recipe
अशाप्रकारे तुमची कांद्याची चटणी तयार आहे.
ही चटणी ताबडतोब सर्व्ह करू शकता. याशिवाय तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून स्टोअरही करू शकता. हीच चटणी थंड जास्त छान लागते.
ही कांद्याची चटणी तुम्ही पराठे, पकोडे, समोसे किंवा कोणत्याही स्नॅक्ससोबत सर्व्ह करू शकता.
हे ही वाचा: Indian filter coffee: अस्सल साऊथ इंडियन स्टाईल फिल्टर कॉफी बनवा घरीच, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत