How to Make Nachnichi Bhakri: नाचणीची भाकरी ही एक पौष्टिक व पचायला हलकी अशी पारंपरिक डिश आहे. नाचणीच्या पीठामुळे ही भाकरी कॅल्शियम आणि लोहतत्त्वांनी भरलेली असते. रोजच्या आहारात आरोग्यदायी पर्याय म्हणून नाचणीची भाकरी उत्तम आहे. नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी ही भाकरी सहज तयार करता येते. नाचणीची भाकरी ही आरोग्यासाठी खूपच पौष्टिक असते. वजन कमी करायचं असो किंवा डायबिटीस कंट्रोल करायचा असो, नाचणीची भाकरी उत्तम पर्याय आहे. चला नाचणीची भाकरी करण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या.
नाचणी पीठ – १ कप
पाणी – अंदाजे १ कप (गरजेनुसार कमी-जास्त)
मीठ – १/२ चमचा
तेल – १ चमचा (ऐच्छिक)
कोमट पाणी मळण्यासाठी
एका पातेल्यात पाणी गरम करा. त्यात थोडं मीठ घाला.
पाणी चांगलं गरम झाल्यावर त्यात रागीचं पीठ घालून हलक्या हाताने ढवळा.
हे मिश्रण झाकून २-३ मिनिटे ठेवा जेणेकरून पीठ थोडं मऊ होईल.
हाताने किंवा काठकुळ्या चमच्याने पीठ हलवून थोडं थंड करा.
हाताने ते चांगलं मळा. गरज वाटली तर थोडं कोमट पाणी घाला.
पीठ मऊसर व घट्टसर मळून घ्या.
हाताला थोडंसं पाणी लावून छोटे गोळे बनवा.
एका प्लास्टिक शीटवर किंवा कोरड्या पाटावर हाताने थोपटून भाकरी पसरवा.
शक्यतो लाटण्याऐवजी हाताने थोपटूनच भाकरी करा.
तवा गरम करा आणि त्यावर भाकरी ठेवा.
एका बाजूने शेकून झाली की पलटून दुसऱ्या बाजूनेही शेकून घ्या.
हवे असल्यास थेट गॅसवर फुगवू शकता.
आरोग्यदृष्ट्या तूप टाळायचं असेल तर तसेच खा, नाहीतर वरून थोडं तूप लावलं तरी चालेल.
पिठलं, भाजी, ठेचा, कांदा किंवा चटणीसोबत ही भाकरी सर्व्ह करा.
रागीचं पीठ नेहमी ताजं वापरावं.
भाकरी करताना पाणी गरम असलं तर भाकरी सॉफ्ट होते.
डायबिटीस असलेल्या लोकांसाठी ही भाकरी उत्तम आहे.