Marathi News> Lifestyle
Advertisement

संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी बनवा बटाटा मका भजी, जाणून घ्या सोपी आणि झटपट होणारी Tea Time Recipe

Potato-Corn Bhaji Recipe: दुपार आणि रात्रीच्या जेवणाच्यामध्ये संध्याकाळी लागणाऱ्या छोट्या भुकेसाठी आणि या पावसाळी वातावरणासाठी तुम्ही ही बटाटा मका भजी बनवू शकता. चला जाणून घ्या त्याची सोपी रेसिपी...   

संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी बनवा बटाटा मका भजी, जाणून घ्या सोपी आणि झटपट होणारी Tea Time Recipe

How to make potato-corn bhaji: भर उन्हाळ्यात आता पाऊस सुरु झाला आहे. बहुतेक महाराष्ट्रातील भागात जोरदार सरी बरसत आहेत. असा पाऊस सुरु झाला की आपोआप काहीतरी गरमागरम आणि कुरकुरीत खाण्याची भूक लागते.  खास करून सुट्टीच्या संध्याकाळी, खिडकीतून पडणाऱ्या सरी बघत चहा सोबत गरम काहीतरी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हाच अनुभव तुम्हाला देण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक भन्नाट रेसिपी. ही रेसिपी आहे  चटकदार बटाटा मका भजीची. कमी वेळात तयार होणारी, टेस्टी भजीची रेसिपी जाणून घ्या. 

चटकदार बटाटा मका भजी

  • वेळ: 15-20 मिनिटं
  • सर्विंग: 3-4 लोकांसाठी

हे ही वाचा: चहा बनवताना आधी पाणी, दूध की आलं? International Tea Day निमित्ताने जाणून घ्या परफेक्ट टेस्टसाठी Recipe

 

लागणारे साहित्य 

  • उकडलेले बटाटे – 2 मध्यम
  • उकडलेला स्वीट कॉर्न – 1/2 कप
  • बेसन – 1 कप
  • तांदळाचं पीठ – 2 टेबलस्पून
  • हिरवी मिरची – 2 (बारीक चिरून)
  • आले – 1 टीस्पून (किसलेलं)
  • हळद – 1/4 टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • हिंग – 1 चिमूट
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – पीठ भिजवण्यासाठी
  • तेल – तळण्यासाठी

हे ही वाचा: नाश्त्यासाठी बनवा सोपं, पौष्टिक आणि झटपट तयार होणारं मूग डाळीचं धिरडे, जाणून घ्या Healthy Breakfast Recipe

कशी बनवायची भजी? 

  • एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. त्यात उकडलेला मका, मिरची, आले, कोथिंबीर, हळद, हिंग, लाल तिखट आणि मीठ टाका.
  • या मिश्रणात बेसन आणि तांदळाचं पीठ टाका. यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून भजीसाठी जास्त ना घट्ट ना पातळ असं पीठ तयार करा. 
  • आता कढईत तेल गरम करा. तेल चांगलं गरम झाल्यावर थोडं थोडं पीठ तेलात घालत कुरकुरीत भजी सोडा. 
  • भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा आणि टिशू पेपरवर काढा.
  • अशाप्रकारे गरमागरम बटाटा-मका भजी तयार आहेत. सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा. 
  • 'या' टिप्स फॉलो करा. 
  • यात तुम्ही गाजर, पालक, किंवा कांदाही मिक्स करू शकता.
  • अजून क्रिस्पी हवं असेल तर थोडंसं रवा घाला.
Read More