How to Make Punjabi Style Lassi Recipe: कडक उन्हाळा सुरु झाला आहे. अशात सतत काही ना काही थंड खावंसं (summer recipe) वाटतं. लोक आवर्जून दही,ताक, लस्सी, ज्यूस किंवा आईस्क्रीमचा आस्वाद घेतात. जेवण झाल्यावर एक थंडगार लस्सी पिण्याचा मोह अनेकजण आवृ शकत नाहीत. लस्सी तुमच्या शरीराला थंडावा देण्यासोबतच अनेक फायदेही देते. थंड लस्सीचे तुमच्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात. रेग्युलरपेक्षा तुम्ही पंजाबी स्टाईल लस्सी बनवू शकता. पंजाबी स्टाईल लस्सी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्य आणि जास्त वेळी लागणार नाही.
एक कप ताजे दही, अर्धा कप थंड पाणी, दोन चमचे साखर, एक चतुर्थांश चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा गुलाबजल, 4 बर्फाचे तुकडे आणि बारीक चिरलेले काजू आणि पिस्ता लागतील.
हे ही वाचा: कोण आहे अनाया बांगर? लिंग बदलानंतर भारतीय खेळाडूंबद्दल धक्कादायक खुलासा करणारी क्रिकेटपटू
हे ही वाचा: लिंग बदल करून आर्यनची झाली अनाया..., पण पीरियड्स येतात का? संजय बांगरच्या लेकीने स्वतःच दिले उत्तर
हे ही वाचा: कोण आहेत अरविंद केजरीवालचे जावई? कॉलेजमधील ओळख ते जीवनसाथी... पहा लग्नाचे Photos
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या लस्सीची चव आवडेल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात लस्सी पिणे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. लस्सीमध्ये आढळणारे घटक तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकतात. ताण कमी करण्यासाठी, तुम्ही लस्सीला तुमच्या डाएट प्लॅनचा भाग बनवू शकता.